लग्नानंतर ट्रॉलर्सना उत्तर देताना मलाला म्हणते…


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : नोबेल पारितोषिक विजेती मलाला नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे जनरल मॅनेजर असर मलिक यांच्यासोबत ती विवाहबंधनात अडकली आहे. तिने आपल्या ट्विटर हँडलवरून आपल्या विवाहाची बातमी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानमधील बऱ्याच ट्विटर यूजर्सनी तिला ट्रोल केले होते. कारण काही दिवसांपूर्वीच म्हणजे चार महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने आपण लग्न ह्या प्रथेच्या सक्त विरोधात आहोत असे मत मांडले होते. नेटकऱ्यांनी तिला या गोष्टीवरून ट्रोल केले होते. या सर्वांना अगदी परफेक्ट उत्तर देत तिने ब्रिटीश वोग सोबतच्या मुलाखतीत योग्य उत्तर दिले आहे.

Replying to trolls after the wedding, Malala says …

मलाला म्हणते, मी पाकिस्तानमध्ये लहानाची मोठी झाली आहे. यामुळे मला तेथे लग्ना विषयीच्या असलेल्या बऱ्याच मिस कन्सेप्ट्स माहीत आहेत. पुरुषसत्ताक समाज पद्धतीमध्ये आजही जर मुलींनी शिकले नाही, त्यांना जर नोकरी मिळाली नाही, तर तुम्ही लग्न केले पाहिजे असे मानले जाते. स्वत:च्या स्वतंत्र आयुष्याला ऑप्शन म्हणून लग्नाकडे पाहिले जाते. अशा समाजात मी लहानाची मोठी झाले आहे. त्यामुळे लग्न हे कोणताही भेदभाव न करता दोन समान व्यक्तींमध्ये व्हावं अशी माझी इच्छा आहे.

पुढे ती म्हणते, अझरसोबत लग्न केल्यानंतर एक बेस्ट फ्रेंड मला मिळाला आहे. जगातील बऱ्याच स्त्रियांना आजही बऱ्याच प्रॉब्लेमचा सामना करावा लागतो. याबद्दल माझ्याकडे आजही उत्तरे नाहीयेत. पण सध्या मी मैत्री, प्रेम आणि लग्नामधील समानता एन्जॉय करण्याचे ठरवले आहे.


मलाला यूसुफजईने आसिरशी बांधली बर्मिंगहॅम मध्ये रेशीमगाठ!!


अशाप्रकारे मलालाने लग्नाबाबतच्या चुकीच्या समजुती वर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आपल्या ट्रोलर्सना उत्तर दिले आहे.

Replying to trolls after the wedding, Malala says …

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात