फायजर भारताला पाच कोटी लसी देण्यास तयार पण ठेवल्या या अटी…


देशात कोरोनाचा कहर सुरू असताना देशवासियांसाठी दिलासादायक बातमी समोर आहे. अमेरिकेतील लस उत्पादक कंपनी फायजरकडून भारताला यावर्षी पाच कोटी डोस देण्यास तयार आहे. मात्र, फायजरकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. फायजरसोबत नुकसानभरपाईच्या अनुषंगाने करार करण्याची अटदेखील फायजरने ठेवली आहे.Pfizer is ready to give five crore vaccines to India but on these conditions …


 

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : देशात कोरोनाचा कहर सुरू असताना देशवासियांसाठी दिलासादायक बातमी समोर आहे. अमेरिकेतील लस उत्पादक कंपनी फायजरकडून भारताला यावर्षी कोरोना प्रतिबंधक लसीचे पाच कोटी डोस देण्यास तयार आहे.

मात्र, फायजरकडून काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. फायजरसोबत नुकसानभरपाईच्या अनुषंगाने करार करण्याची अटदेखील फायजरने ठेवली आहे.फायजरने भारताला पाच कोटी डोस याच वर्षी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.



त्यापैकी एक कोटी डोस जुलै महिन्यात, आॅगस्टमध्ये एक कोटी डोस, सप्टेंबर महिन्यात दोन कोटी डोस आणि आॅक्टोबर महिन्यात एक कोटी फायजरकडून उपलब्ध केले जाऊ शकतात. लस खरेदीबाबत चर्चा फायजर फक्त भारत सरकारसोबत करणार आहे.

त्याशिवाय लस खरेदीचे पैसेदेखील भारत सरकारने ‘फायजर इंडिया’ला द्यावेत असे कंपनीने म्हटले आहे.मात्र, ही तयारी दर्शविताना फायजरने काही अटी घातल्या आहे. मुख्य म्हणजे फायजरकडून मिळालेल्या लशीचे वितरणही भारत सरकारलाच करावे लागणार आहे.

त्याशिवाय फायजरसोबत नुकसानभरपाईच्या अनुषंगाने करार करण्याची अटदेखील फायजरने ठेवली आहे. फायजरने अमेरिकेसह जगातील ११६ देशांसोबत असा करार केला आहे. जगभरात आतापर्यंत फायजरने लशीचे १४.७ कोटी डोसचा पुरवठा केला आहे.

आतापर्यंत लस घेतल्याने कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाल्याची तक्रार समोर आली नाही.दुसरीकडे एकच डोस असणारी मॉडनार्ची लस पुढील वर्षी भारतात उपलब्ध होऊ शकते. कंपनीकडून मिळालेल्या यावर्षी २०२१ मध्ये अमेरिकेबाहेर वितरीत करण्यासाठी मॉडर्नाकडे लस साठाच नाही.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनदेखील निकटच्या काळात अमेरिकेतून इतर देशांना लस पुरवठा कितपत करेल याची शंका अधिक आहे.मॉडनार्ने विकसित केलेल्या एक डोसच्या लशीचा पुरवठा केल्यास लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे.

स्पुटनिक लाइट ही लशीचाही एकच डोस दिला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही लशींचा वापर भारतात केल्यास लसीकरण मोहिमेला मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, आता फायजरने तयारी दर्शविल्याने भारतातील लसीकरणाला गती मिळण्याची शक्यता आहे.

भारतात लस तुटवडा जाणवत असून त्यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत लशीच्या उपलब्धतेबाबत कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात काही बैठका पार पडल्या. भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीचा वापर केला जात आहे. भारतात आतापर्यंत २० कोटी डोस देण्यात आले आहेत.

Pfizer is ready to give five crore vaccines to India but on these conditions …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात