Pervez Musharraf Profile : भारताच्या या शत्रूचा दिल्लीत झाला जन्म, आईचे अलीगडमध्ये शिक्षण, वडील अधिकारी, बलुच महिलांचा केला छळ


प्रतिनिधी

पाकिस्तानचे माजी लष्करी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ सध्या अखेरचे काही श्वास घेत आहेत. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुशर्रफ एमायलोइडोसिस या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आता यातून ते सावरणे कठीण असल्याचे त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. कुटुंबाने लोकांना दुवा करण्याचेही आवाहन केले आहे.Pervez Musharraf Profile This enemy of India was born in Delhi, his mother was educated in Aligarh, his father was an officer, he persecuted Baloch women

दिल्लीत बालपण घालवलेले परवेज मुशर्रफ यांचे पाकिस्तानात जाऊन पॉवरफुल हुकूमशहा बनणे, नंतर आपल्याच देशातून पळून जाणे आणि दुबईत आश्रय घेणे ही जणू फिल्मी कथाच आहे. पण मुशर्रफ यांचे आयुष्य असेच राहिलेले आहे. दिल्लीत जन्मलेल्या, भारताचा शत्रू नंबर-1 बनलेल्या आणि नंतर फरारी बनलेल्या मुशर्रफ यांची कहाणी खूप रंजक आहे.



दिल्लीच्या बंगल्यात राहिले मुशर्रफ कुटुंब

परवेझ मुशर्रफ यांचे कुटुंब फाळणीपूर्वी भारतात खूप समृद्ध होते. त्यांचे आजोबा कर वसूल करणारे अधिकारी होते. त्यांचे वडीलही ब्रिटिश राजवटीत मोठे अधिकारी होते. मुशर्रफ यांच्या आईने अलीगड मुस्लिम विद्यापीठात शिक्षण घेतले. जुन्या दिल्लीत मुशर्रफ कुटुंबाचा मोठा बंगला होती. मुशर्रफ त्यांच्या जन्मानंतर चार वर्षांपर्यंत ते येथेच राहिले.

परवेझ मुशर्रफ यांच्या आई बेगम जरीन मुशर्रफ यांनी 2005 मध्ये भारत भेटीदरम्यान लखनौ, दिल्ली आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला भेट दिली. जरीन 1940 मध्ये येथे शिकत होत्या.

मुशर्रफ कुटुंबानेही पाकिस्तानात आपली वेगळी ओळख निर्माण केली

1947 मध्ये फाळणीच्या वेळी, त्यांचे कुटुंब 4 वर्षीय परवेझ मुशर्रफ यांच्यासोबत पाकिस्तानातील कराची येथे गेले. ब्रिटिश सरकारसाठी काम करणारे मुशर्रफ यांचे वडील पाकिस्तानच्या नव्या सरकारमध्ये अधिकारी झाले. ते पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयात काम करू लागले. अशा प्रकारे मुशर्रफ कुटुंबाला पाकिस्तान या नव्या देशातही आपला ठसा उमटवता आला.

मुशर्रफ सैन्यात भरती झाले, 1965 मध्ये भारतासोबत लढले

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी लष्करात कनिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले. 1965च्या युद्धात ते भारताविरुद्ध लढले. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. असे असतानाही मुशर्रफ यांना त्यांच्या शौर्याबद्दल पाकिस्तान सरकारने पदक दिले होते.

मुशर्रफ यांनी 1971च्या युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे लक्षात घेऊन सरकारने त्यांना अनेकवेळा बढती दिली. 1998 मध्ये परवेझ मुशर्रफ जनरल झाले. भारताविरुद्ध कारगिलचा कट त्यांनीच रचला. पण हा कट भारतीय वीरांनी साहसाने उधळून लावला.

जनरल मुशर्रफ यांनी त्यांच्या ‘इन द लाइन ऑफ फायर – अ मेमोयर’ या चरित्रात लिहिले आहे की, त्यांनी कारगिल काबीज करण्याची शपथ घेतली होती. मात्र नवाझ शरीफ यांच्यामुळे त्यांना हे करता आले नाही.

ज्या नवाझ शरीफांनी लष्करप्रमुख केले, त्यांनाच सत्तेतून हाकलले

1998 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी परवेझ मुशर्रफ यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पाकिस्तानी लष्करप्रमुख बनवले. पण एक वर्षानंतर 1999 मध्ये जनरल मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांना पदच्युत केले आणि ते पाकिस्तानचे हुकूमशहा बनले. नवाझ शरीफ यांना कुटुंबासह पाकिस्तान सोडावे लागले.

सत्तेत असताना जनरल मुशर्रफ यांनी बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली. शेकडो लोकांची हत्या झाली. त्यामुळेच सत्तेत आल्यानंतर बलुच महिलांनी जनरल मुशर्रफ यांना जागतिक दहशतवादी घोषित करण्याची मागणी अमेरिकेकडे केली होती.

महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी मुशर्रफही स्मरणात राहतील

जनरल परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानमध्ये देशद्रोह आणि सामूहिक हत्या अशा अनेक खटल्यांचा सामना करावा लागला. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षाही सुनावली. मात्र, फाशी देण्यापूर्वी ते उपचाराच्या नावाखाली परदेशात पळून गेले. या सर्व कुकर्मांमध्ये, महिलांना अधिक अधिकार देणारे नेते म्हणून जनरल मुशर्रफ यांचीही पाकिस्तानात आठवण होते.

मुशर्रफ यांच्या काळातच पाकिस्तानच्या सदनांत महिला मोठ्या संख्येने पोहोचल्या. अशाच प्रकारे त्यांनी इस्लामिक रेप कायद्यात बदल केला. ज्यामध्ये बलात्कार सिद्ध करणे खूप गुंतागुंतीचे होते. या सगळ्यासाठी पाकिस्तानचे कट्टरपंथीय जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातही गेले होते.

Pervez Musharraf Profile This enemy of India was born in Delhi, his mother was educated in Aligarh, his father was an officer, he persecuted Baloch women

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात