पाकिस्तानी अर्थमंत्र्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की : वॉशिंग्टनमध्ये घेराव घालत चोर-चोरच्या घोषणा; वर्ल्ड बँकेच्या बैठकीसाठी गेले होते


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : वॉशिंग्टन विमानतळावर गुरुवारी पाकिस्तानचे अर्थमंत्री इशहाक डार यांना काही लोकांनी घेराव घालत चोर-चोर अशा घोषणा दिल्या. डार हे वर्ल्ड बँकेच्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी वॉशिंग्टनला आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ते पाकिस्तानात अमेरिकन राजदूत मसूद खानसोबत दिसत आहेत.Pakistan’s finance minister’s dance at the international level Thieves’ announcements under siege in Washington; Went for World Bank meeting



डार यांनीही प्रत्युत्तरात आंदोलनकर्त्यांना खोटे ठरवले. पीएमएल-एनच्या व्हर्जिनिया चॅप्टरचे अध्यक्ष मनी बट यांची आंदोलकांशी झटापट झाली. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सौदी अरेबियाच्या दौऱ्यात मदिनामध्ये स्थलांतरित पाकिस्तान्यांची घोषणाबाजी सहन करावी लागली होती.

१२ तास अंधारात बुडाले पाकिस्तान : वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण पाकिस्तान १२ तास अंधारात बुडाले होते. लाहोर व कराचीत वीजपुरवठा खंडित होता. ८ हजार मेगावॅट पाॅवर ब्रेकडाऊनमुळे ब्लॅकआऊट झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी रात्री उशिरा सरकारने वीजपुरवठा सुरळीत केला.

Pakistan’s finance minister’s dance at the international level Thieves’ announcements under siege in Washington; Went for World Bank meeting

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात