आता बंद होणार पेट्रोल – डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन ; जगातील ६ मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय

या सहा कंपन्यांपैकी एक कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे.या ६ कंपन्यांनी २०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे मान्य केले आहे.Now the production of petrol-diesel vehicles will be discontinued; Big decision taken by 6 largest automakers in the world


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वाहनामधून बाहेर पडणाऱ्या धुराने जगातील प्रदुषणामध्ये वाढ झाली आहे. सध्या जवळजवळ प्रत्येक देश याच प्रदूषणाचे परिणाम भोगत आहेत. प्रदुषणावर मात करण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. अशात जगातील ६ मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या सहा कंपन्यांपैकी एक कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे.या ६ कंपन्यांनी २०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे मान्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वीडनची व्हॉल्वो, अमेरिकन ऑटोमेकर फोर्ड, जनरल मोटर्स डेमलर एजीची मर्सिडीज बेंझ, चीनची बीवायडी आणि टाटा मोटर्सची जॅग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ग्लासगोमध्ये प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणार आहेत.

दरम्यान स्वाक्षरी केलेल्या या कंपन्या २०४० पर्यंत जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करतील. या मोहिमेचा उद्देश इलेक्ट्रिक कार वापरणे आणि शून्य उत्सर्जन असलेल्या इतर वाहनांना प्रोत्साहन देणे हे आहे.२१ व्या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्याच्या मोहिमेचा महत्त्वाचा भाग बनणे हा या प्रतिज्ञाचा उद्देश आहे.

Now the production of petrol-diesel vehicles will be discontinued; Big decision taken by 6 largest automakers in the world