अधिकारी शेजारीच भाजतात चक्क चिकन तर खिशात ठेवतात मिठाई, नवाल्नी मात्र उपोषणावर ठाम, वजनात रोज एक किलोची घट

विशेष प्रतिनिधी

मॉस्को – रशियातील राजकीय विरोधक  एलेक्सी नवाल्नी यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडली आहे. त्यांच्या पायांमधील तसेच हात आणि मनगटातील संवेदना कमी होत आहे. पाठ आणि पायाच्या दुखण्यावर योग्य वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचा दावा करीत नवाल्नी यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. दिवसागणिक एका किलोने त्यांचे वजन घटते आहे.

नवाल्नी ४४ वर्षांचे असून गेल्या आठवड्यात त्यांनी उपोषण सुरु केले. त्यात अडथळा यावा म्हणून तुरुंगातील अधिकारी आपल्याजवळ चिकन भाजतात आणि खिशांमध्ये मिठाई ठेवतात असा आरोप नवाल्नी यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे केला आहे.नवाल्नी यांचे वकील वादीम कोब्झेव यांनी बुधवारी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. नवाल्नी स्वतः चालत आहेत, पण त्यांना त्रास होतो. त्यांचा आजार बळावत चालला असून हे अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

हद्दपार करण्यात आलेल्या कैद्यांच्या पोक्रोव येथील वसाहतीमध्ये नवाल्नी यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना तेथे अडीच वर्षांसाठी ठेवण्यात येईल. त्यांच्या पाठीच्या मणक्यात दोन ठिकाणी हार्निया झाला असून पायाचे दुखणे जडले आहे. सतत सर्दी आणि ताप असल्याचेही नवाल्नी यांनी कोब्झेव यांना सांगितले.


वाचा आणखी महत्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*