म्यानमारच्या लष्करी राजवटीची मुस्कटदाबी थोडी शिथील, यांगूनमधील आंदोलकांना तुरुंगातून दिले सोडून

विशेष प्रतिनिधी

यांगून – म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात सुरु असलेले आंदोलन क्रूरपणे दडपून टाकण्याचा प्रयत्न होत असताना गेल्या पावणे दोन महिन्यांत यांगूनमध्ये अटक केलेल्या शेकडो आंदोलकांना अचानक मुक्त करण्यात आले. यामुळे लष्करी राजवटीने आंदोलकांबाबत शिथील धोरण अवलंबिण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसू लागले आहे. Myanmar military freed the demonstraters

यांगूनमधील तुरुंगांमधून शेकडो आंदोलक बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असला तरी लष्करी राजवटीविरोधात सुरु असलेला लढा कायम ठेवण्याचा निर्धारही अनेकांनी बोलून दाखविला. पोलिसांनी एकूण ६२८ आंदोलकांना सोडले. पोलिसांनी म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की आणि इतर ५५ आंदोलकांना केवळ ताब्यात ठेवले असून त्यांच्याविरोधात खटला चालविला जाणार आहे.एक फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांनी सुरुवातीला बॅरिकेड, नंतर लाठीमार आणि मग अश्रुधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्याचाही मारा केला. मात्र, काही दिवसांनी दडपशाही सुरु करत थेट गोळीबार सुरु केला. या गोळीबारात आतापर्यंत २७५ आंदोलक मारले गेले आहेत. यांगूनमधील आंदोलकांना तुरुंगातून सोडले असले तरी देशभरात अद्यापही अडीच हजारांहून अधिक जण अटकेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Myanmar military freed the demonstraters

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*