भरचर्चमध्ये ब्रिटिश खासदाराची निर्घृण हत्या, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अमीस यांचा चाकूहल्ल्यानंतर रुग्णालयात मृत्यू

MP David Amess Conservative Party Stabbed In Church, died in hospital today

MP David Amess : ब्रिटनमध्ये शुक्रवारी एका व्यक्तीने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पक्षाचे खासदार डेव्हिड अमीस यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथेच त्यांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, अमीस घटनेच्या वेळी एका चर्चमध्ये होते आणि आपल्या भागातील लोकांशी बोलत होते. आरोपीला अटक करण्यात आली आहे. MP David Amess Conservative Party Stabbed In Church, died in hospital today


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनमध्ये शुक्रवारी एका व्यक्तीने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पक्षाचे खासदार डेव्हिड अमीस यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथेच त्यांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार, अमीस घटनेच्या वेळी एका चर्चमध्ये होते आणि आपल्या भागातील लोकांशी बोलत होते. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अमिस यांच्यावर अनेक वार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या समर्थकांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. हल्लेखोराचे वय 25 वर्षे असल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडून खुनामध्ये वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.

अमिस हे साउथएंड ऑफ एसेक्सचे खासदार होते, हा पूर्व इंग्लंडचा भाग आहे. घटनेच्या वेळी ते मेथोडिस्ट चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. प्रार्थनेनंतर ते काही लोकांशी बोलत होता. यादरम्यान, हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

अमीस यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, या हल्ल्याला दुजोरा देण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी याबाबत फारशी माहिती दिलेली नाही. मात्र, हल्लेखोराच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. त्याची ओळखही उघड झालेली नाही.

MP David Amess Conservative Party Stabbed In Church, died in hospital today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात