म्यानमारच्या लोकांची थायलंडमध्ये धाव, मोठ्या प्रमाणावर स्थलांतराच्या शक्यतेने सरकार धास्तावले

वृत्तसंस्था

यांगून : म्यानमारच्या लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या आणि अधिक स्वायत्तता मागणाऱ्या कारेन गावातील बंडखोरांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने शेजारील थायलंडमध्ये पळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे थायलंडने सीमेवरील बंदोबस्त कडक केला आहे. Lot of people enters in Thailand from Myanmar

संभाव्य स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर थायलंड सरकारने, सर्वांना सरसकट प्रवेश देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आमच्या सीमा सर्वांसाठी खुल्या नसल्या तरी मानवाधिकारांचाही आम्ही निश्चि.त विचार करणार आहोत,’ असे सरकारने सांगितले आहे.आतापर्यंत प्रवेश केलेल्या म्यानमारमधील लोकांची तात्पुरती व्यवस्था केली असली तरी त्यांच्यासाठी छावण्या उभारण्याचा आमचा कोणताही विचार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कारेन गावातील ‘कारेन नॅशनल लिबरेशन आर्मी’ने लष्कराच्या एका ठाण्यावर हल्ला करत त्याचा ताबा घेतला होता. त्याला प्रत्युत्तर देताना लष्कराने रविवारी या गावावर हवाई हल्ला केला होता. या घटनेनंतर या गावातील जवळपास अडीच हजार जणांनी सीमा ओलांडून थायलंडमध्ये प्रवेश केला आहे. आणखी किमान १० हजार जण स्थलांतराच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारेनमधील बंडखोर गट आणि लष्करी राजवटीविरोधात निदर्शने करणारे आंदोलनकर्ते एकमेकांना सहकार्य करण्याचीही चिन्हे आहेत. म्यानमारमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांवर दडपशाही सुरुच ठेवली असून शनिवारी एकाच दिवशी किमान ११४ आंदोलकांना गोळी घालून ठार करण्यात आले.

Lot of people enters in Thailand from Myanmar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*