ब्रिटनने भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकल्याने प्रवासी अडचणीत, अतिरिक्त उड्डाणास हिथ्रोचा नकार


विशेष प्रतिनिधी

लंडन : हिथ्रो विमानतळाने भारतातून अतिरिक्त उड्डाणाला परवानगी नाकारली आहे. ‘कोविडच्या निर्बंधामुळे नागरिक मायदेशी परतण्याची घाई करत असताना हिथ्रो विमानतळ प्रशासनाने त्यास ब्रेक लावला आहे. India is in Red list by briton

भारतात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता ब्रिटनने भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकले आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी म्हटले की, विमान कंपन्यांना अतिरिक्त उड्डाणांना परवानगी नाकारण्यामागचे कारण सांगताना त्यांनी म्हटले की,



पासपोर्ट तपासणीसाठी मोठी रांग लागते आणि ही बाब कोविडच्या काळात जोखमीची आहे. चार विमान कंपन्यांनी भारतातून अतिरिक्त आठ उड्डाणांची परवानगी मागितली होती. संबंधित प्रवासी कोविडचे नवीन नियम लागू होण्यापूर्वी आपापल्या देशात जाऊ इच्छित आहेत.

सध्या भारत आणि ब्रिटन यांच्यात आठवड्यातून ३० उड्डाणे होत आहेत. ही उड्डाणे अपुरी पडत असल्याने त्याची संख्या वाढवण्याची कंपन्यांनी मागणी केली होती. परंतु अधिक प्रवाशांना प्रवासाची परवानगी देऊन सीमेवरचा दबाव आणखी वाढवू इच्छित नाही, असे हिथ्रो विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे.

India is in Red list by briton

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात