जेम्स वॅटने वाफेवरचे मशीन बनविलेल्या ग्लासगो शहरात जागतिक हवामान बदल परिषद सुरू


वृत्तसंस्था

ग्लासगो : प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ जेम्स वॅटने 250 वर्षांपूर्वी ज्या शहरात वाफेचे मशीन बनवले त्या ग्लासगो मध्ये जागतिक हवामान बद्दल परिषद सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि g20 देशांचे राष्ट्रप्रमुख या परिषदेत सहभागी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रोस यांच्या प्रमुख भाषणाने या परिषदेला सुरुवात झाली आहे.Glasgow 250 years ago, that James Watt came up with a machine that was powered by steam that was produced by burning coal.

भूमी अंतर्गत ऊर्जास्रोतांच्या ज्यादा वापरामुळे आपण सर्वांनी पृथ्वीला तापमान वाढीच्या धोक्यामध्ये आणून सोडले आहे, अशी आत्मटीका गुट्रोस यांनी केली आहे. आपण सगळे जागतिक तापमान वाढीला जबाबदार असू तर ही आपल्यावरच जबाबदारी आहे की हे तापमान कमी करण्यासाठी आपण अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राचा विस्तार केला पाहिजे आणि इकोफ्रेंडली ऊर्जेचा वापर वाढविला पाहिजे, यावर गुट्रोस यांनी भर दिला.

6 वर्षांपूर्वी पॅरिस जागतिक हवामान बदल करार झाल्यानंतर 2021 हे वर्ष जगातले सगळ्यात जास्त तापमान वाढीचे वर्ष ठरले आहे आता हे बस झाले असे म्हणण्याची वेळ आली आहे असा इशारा देखील गुट्रोस यांनी सर्व राष्ट्र प्रमुखांना दिला.

ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सर्व राष्ट्र प्रमुख यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी जेम्स वॅट यांनी बनविलेल्या वाफेच्या मशीन ची आठवण सर्व राष्ट्र प्रमुखांना करून दिली.

Glasgow 250 years ago, that James Watt came up with a machine that was powered by steam that was produced by burning coal.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात