काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला : 2 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांसह 20 ठार; सहा वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील दारुल अमान भागात रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला झाला आहे. सोमवारी झालेल्या स्फोटात दोन रशियन अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला होता.Fidayeen attack outside Russian Embassy in Kabul 20 killed including 2 Russian diplomats; The attack happened here even 6 years ago

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका आत्मघाती हल्लेखोराने रशियन दूतावासाबाहेर स्वत:ला उडवले. स्फोटावेळी काही अफगाण नागरिक व्हिसा घेण्यासाठी तिथे उपस्थित होते. या घटनेबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.



संशयित दूतावासाबाहेर फिरत होता

दूतावासात तैनात असलेल्या रक्षकाने सांगितले – एक संशयित रशियन दूतावासात फिरत होता. तो गेटजवळ आला. आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो न थांबल्याने आम्ही त्याच्यावर गोळीबार केला. तो जखमी झाला. काही वेळातच त्याने स्वत:ला उडवले.

2016 मध्येही स्फोट

2016 मध्ये अफगाणिस्तानमधील रशियन दूतावासाजवळ स्फोट झाला होता. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 हून अधिक लोक जखमी झाले होते.

Fidayeen attack outside Russian Embassy in Kabul 20 killed including 2 Russian diplomats; The attack happened here even 6 years ago

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात