तटरक्षक दलाने पकडली श्रीलंकन नौका, तीन हजार कोटी रुपयांचे हेरॉईन आणि शस्त्रसाठा जप्त

तटरक्षक दलाने अरबी समुद्रातील एका श्रीलंकन नौकेवर कारवाई करून तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे ३०० किलो हेरॉईन आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.Coast Guard seizes Sri Lankan boats, seizes heroin and arms worth Rs 3,000 crore


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : तटरक्षक दलाने अरबी समुद्रातील एका श्रीलंकन नौकेवर कारवाई करून तब्बल तीन हजार कोटी रुपयांचे ३०० किलो हेरॉईन आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

तटरक्षक दलाच्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात ही कारवाई केली आहे. संशयित नौकेला घेराव घालून जवळपास ३००० कोटी रुपयांचा अमली पदाथार्चा साठा आणि पाच एके 47 रायफल आणि १ हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्विपजवळील मिनीकॉस येथे ही कारवाई करण्यात आली



े २६/११ हा मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला देखील भारतीय बोटी ताब्यात घेऊन दहशतवाद्यांना मुंबईत शिरकाव केला होता. हा प्रकार देखील तसाच आहे का? याबाबत तपास सुरु आहे. अमली पदाथार्चा साठा, ५ रायफली आणि काडतुसे घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत असलेल्या नौकेला घेराव घालून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. समुद्री संरक्षण मोहिमेंतर्गत समुद्री तसेच हवाई समन्वयाने ही कारवाई करण्यात आली.

तटरक्षक दलाची गस्ती नौका गस्त घालत असताना तीन मच्छिमार नौका संशयास्पद स्थितीत दिसून आल्याची माहिती मिळाली. विमानाने टेहळणी करून संबंधित नौकांबद्दल अधिक माहिती मिळवून नेमके ठिकाण गस्तीवर असलेल्या नौकेला कळवण्यात आले. त्यानुसार गस्ती नौकेने या तिन्ही मच्छिमार नौकांना घेराव घातला.

तीनपैकी रवीहंसी ही श्रीलंकन मच्छिमार बोट अमली पदार्थ व रायफल घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत होती. अन्य दोन नौका तिला संरक्षण पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिन्ही नौकांसह त्यावरील १९ खलाशांना तटरक्षक दलाने ताब्यात घेत मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे.

Coast Guard seizes Sri Lankan boats, seizes heroin and arms worth Rs 3,000 crore

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*