तालिबान सरकारवर नियंत्रण ठेवण्यावरून पाकचे लष्कर आणि ‘आयएसआय’मध्ये वाद


इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारवर नियंत्रण ठेवण्यावरून पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा आणि ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांच्यात वाद निर्माण झाला आहे.Army and ISI target each other on Taliban issue

पाकिस्तानच्या हस्तक्षेपावरून तालिबानमध्येही अंतर्गत वाद निर्माण झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. इतर देशांबरोबर संबंध प्रस्थापित करण्याबाबत तालिबान सरकार घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात ‘आयएसआय’चा हस्तक्षेप असतो. तसेच, पाश्चिथमात्य देशांकडून अफगाणिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्येही ‘आयएसआयला वाटा हवा आहे.



गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल बाज्वा हे आपल्याला पदावरून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ‘आयएसआय’चा प्रभाव मोठा असल्याने त्यांना ते अद्यापपर्यंत शक्य झाले नसल्याचा लेफ्ट.जन. हमीद यांचा आरोप आहे.

‘गेल्या अनेक वर्षांत आयएसआयने तालिबानी नेत्यांना बळ देताना त्यांच्या कारवायांना खतपाणी घातले. त्यांचा वापर करून आयएसआयने अफगाणिस्तानमधील आपली उद्दीष्टे साध्य केली. आता तालिबान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करालाही नियंत्रण आणि निर्णय प्रक्रियेत वाटा हवा आहे,’

अशी माहिती सूत्रांनी एका इंग्रजी माध्यमाला दिली. ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांचे तालिबानी नेत्यांशी आणि तालिबानशी संबंधित अनेक गटांबरोबर चांगले संबंध असून अफगाणिस्तानातही त्यांचे गुप्तचरांचे जाळे आहे

Army and ISI target each other on Taliban issue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात