200 रुपये लीटर : पाकिस्तानात पेट्रोल दरवाढीची उंच उडी; विमान कर्मचार्‍याने मागितली गाढव गाडी!!


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानात पेट्रोल दरवाढीने मारली उंच उडी आणि विमान कर्मचाऱ्याने मागितली गाढव गाडी!!, अशी स्थिती येऊन ठेपली आहे. पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने अक्षरशा उच्चांक गाठत 200 रुपये लिटर हा दर पार केला आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विमानतळ सेवांनी पिक-अप आणि ड्रॉप सेवा बंद करून टाकली आहे. या पार्श्वभूमीवर विमानातल्या विमानसेवेचे एका कर्मचाऱ्याने विमानतळ प्रशासनाकडे चक्क गाढव गाडीची परवानगी मागितली आहे. Petrol hike 200 rs/per litter in Pakistan. Aviation employee demands permission for use of donkey cart

पेट्रोल खिशाला परवडत नाही. मिळालेला पगार पुरत नाही आणि नोकरी सोडवत नाही म्हणून निदान गाढव गाडीवर बसून कामावर येण्याची परवानगी द्यावी, असे पत्रच असिफ इक्बाल या जेष्ठ कर्मचाऱ्याने पाकिस्तानातल्या विमानतळ प्राधिकरणाला पाठवले आहे. हे पत्र सोशल मीडियावर पाकिस्तानात आणि बाहेरच्या देशांमध्ये प्रचंड व्हायरल झाले आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था किती कोलमडली आहेत याचेच हे निदर्शक आहे!!

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ गेल्या 8 दिवसात 60 रुपयांनी झाली आहे. पेट्रोल 200 रुपयांच्या घरात पोहोचले आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर होऊन छोट्या शहरांमध्ये रस्ते अक्षरशः ओस पडले आहेत. पाकिस्तान महागाईने पूर्ण होरपळून निघाला आहे. असिफ इक्बाल या कर्मचाऱ्याचे पत्र व्हायरल झाल्याने जगाच्या चव्हाट्यावर पाकिस्तानची आर्थिक हालत किती खस्ता आहे हे आले आहे याचे चित्र उभे राहिले आहे.

पाकिस्तानला इंटरनॅशनाल मॉनेटरी फंड पतपुरवठा करायला तयार नाही. बाकीची कोणतेही बडे देश पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी दारातही उभे करत नाही. पाकिस्तानला भारतीय गंगाजळीचा साठा संपत आला आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक अवस्था वेगाने श्रीलंकेच्या दिशेने जाताना दिसत आहे. विमान कर्मचाऱ्याचे गाढव गाडीची परवानगी मागण्याचे पत्र व्हायरल होणे हे पाकिस्तानची अर्थव्यवस्था किती रसातळाला पोहोचली आहे याचेच निदर्शक ठरत आहे.

Petrol hike 200 rs/per litter in Pakistan. Aviation employee demands permission for use of donkey cart

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात