थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची, आशिष शेलार यांचा पलटवार


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात थाळ्या व टाळ्यांचा उल्लेख झाला. आमचे हिंदुत्व तुमच्या थाळ्या व टाळ्या वाजवण्यासारखं नाही असं ते म्हणाले. हिंदुत्वाचाच विषय घ्यायचा असेल व जर टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाहीत, तर काय घरात बसून अंडी उबवायची? स्वत: घरात बसून मार्गदर्शन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा अधिकार नाही, असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात थाळ्या व टाळ्यांचा उल्लेख झाला. आमचे हिंदुत्व तुमच्या थाळ्या व टाळ्या वाजवण्यासारखं नाही असं ते म्हणाले. हिंदुत्वाचाच विषय घ्यायचा असेल व जर टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाहीत, तर काय घरात बसून अंडी उबवायची? स्वत: घरात बसून मार्गदर्शन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा अधिकार नाही, असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवरून भाजपावर टीका केली होती. यावर पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले की, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वारंवार म्हटलं जातं. यातून त्यांच्या मनात असलेली एक असुरक्षितता व भीती यातून दिसते.

शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला केव्हाच आव्हान दिलं आहे की, अगोदर सरकार चालवून तरी दाखवा. आमचं तर म्हणणं आहे की कधीतरी घराबाहेर पडून तरी दाखवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात थाळ्या व टाळ्यांचा उल्लेख झाला. आमचं हिंदुत्व तुमच्या थाळ्या व टाळ्या वाजवण्या सारखं नाही असं ते म्हणाले. मात्र सर्वात अगोदर तर हा संदर्भ चुकीचा आहे. टाळ्या व थाळ्यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता. तो चीनी व्हायरसविरुध्द लढणाऱ्या योद्ध्यांचा उत्साह वाढवण्यासाठीचा विषय होता. हिंदुत्वाचाच विषय घ्यायचा असेल आणि जर टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाहीत, तर काय घरात बसून अंडी उबवायची?

महाराष्ट्र जेव्हा एका अर्थाने महापुरामध्ये, करोनामध्ये, चक्रीवादळामध्ये त्रस्त होता. त्यावेळी तुम्ही काय करत होता? हा महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारतो आहे, असे शेलार म्हणाले. शिवसेनेचा दसरा मेळावा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फ्लॉप चित्रपटासारखा होता अशी टीका करून शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे त्यांच्या हिंदुत्वाची संघाच्या हिंदुत्वाबरोबर तुलना करत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेल्यापासून त्यांचे हिंदुत्व भेसळयुक्त झाले आहे. होय, उद्धव ठाकरेंना संघाकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता आहे.

शेलार म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणात जळफळाट व केवळ जळफळाट होता. एका बाजुला अर्णब गोस्वामी व कंगना रनौटने शिवसेनेची जी वाट लावली त्याचं दडपण व दुसऱ्या बाजुला संरसंघचालकांच्या भाषणामागे स्वत:ला दडवण्याचा प्रयत्न म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण होतं. भाजपच्या ताकदीची दहशतही त्यांच्या भाषणामध्ये दिसत होती. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या हिंदुत्वाची तुलना संघाच्या हिंदुत्वाशी करणं हा त्वचा नी शाल यांच्यामध्ये असलेला फरक आहे. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व म्हणजे म्हणजे गरज नसताना हिंदुत्वाची शाल बाजुला ठेवणं आहे. तर संघाचं हिंदुत्व हे त्वचेसारखं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला संघाचं समर्थन आहे, तर उद्धव ठाकरेंचं आधी समर्थन होतं, मग सभागृहातून पळ काढला व बाहेर पडल्यावर अशा भेसळयुक्त हिंदुत्वाची भाषा सरसंघचालकांच्या भाषणात नव्हती. असं शेलार यांनी म्हटलं आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था