तिबेटी नागरिकांची भारतीय लष्कराला मानवंदना


चीनला सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराला तिबेटच्या नागरिकांनी अनोखी मानवंदना दिली. भारतीय लष्कराच्या वाहनांचा ताफा सीमेवर जात असताना तिबेटच्या नागरिकांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवत जवानांचे स्वागत केले.


वृत्तसंस्था

मनाली : चीनला सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराला तिबेटच्या नागरिकांनी अनोखी मानवंदना दिली. भारतीय लष्कराच्या वाहनांचा ताफा सीमेवर जात असताना तिबेटच्या नागरिकांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवत जवानांचे स्वागत केले.

तिबेटच्या नागरिकांमध्ये चीनबद्दल प्रचंड संताप आहे. तिबेट ताब्यात घेऊन चीनने अनेक नागरिकांना निर्वासितांचे जिणं जगायला लावले आहे. तिबेटचे सर्वोच्च नेते दलाई लामा यांनाही भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने चीनी लष्कराला कडक प्रत्युत्तर दिल्याने तिबेटी नागरिकांना प्रचंड आनंद झाला आहे.

मनालीत राहत असलेल्या तिबेटच्या निर्वासित नागरिकांनी भारतीय लष्कराचे जोरदार स्वागत केली. या तिबेटच्या नागरिकांनी भारतीय लष्कराच्या ताफ्याला जाताना पाहून रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत केले.

तिबेटचे नागरिक चीनचा निषेध करत भारतीय लष्कराचे स्वागत करताना दिसत होते. नागरिकांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकावत भारतीय जवानांचा उत्साह वाढवला. लडाखच्या सीमेवर जाणारा रस्ता हा मनालीतून जातो. तिथे हे जोरदार स्वागत झाले.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे तिबेटमधील निर्वासित सरकारचे मुख्यालय आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामाही इथेच राहतात. तिबेटवर कब्जा करताना चीनमधील कम्युनिस्ट सरकारने तेथील अनेक बौद्ध मठ तोडले. यासोबतच अनेक धार्मिक नेत्यांची हत्याही केली. एवढचं नव्हे तर प्रशासनाला धोका असल्याचे पाहून अनेक बौद्ध मठांवर चीनने कब्जाही केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती