ठाकरे सरकारची दंडेलशाही, टीका केली म्हणून यूट्युब ब्लॉगरला दिल्लीतून पकडून आणले

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या एका यू ट्युब ब्लॉगरला पोलीसांनी गुंडाप्रमाणे दिल्लीत पकडून मुंबईला आणले. व्यक्तीस्वातंत्र्याचा उठता बसता जप करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गृहमंत्र्यांच्या राज्यात हा प्रकार घडला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे चिडीचूप असताना अभिनत्री कंगना रनौटने त्याच्या बाजुने बोलण्याचे धाडस दाखविले आहे. साहिलला सोडून अनुराग कश्यपला अटक करावी, अशी मागणी तिने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या एका यू ट्युब ब्लॉगरला पोलीसांनी गुंडाप्रमाणे दिल्लीत पकडून मुंबईला आणले. व्यक्तीस्वातंत्र्याचा उठता बसता जप करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गृहमंत्र्यांच्या राज्यात हा प्रकार घडला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे चिडीचूप असताना अभिनत्री कंगना रनौटने त्याच्या बाजुने बोलण्याचे धाडस दाखविले आहे. साहिलला सोडून अनुराग कश्यपला अटक करावी, अशी मागणी तिने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

साहिल चौधरी असे या ब्लॉगरचे नाव आहे. साहिल चौधरी एक युट्यूब ब्लॉगर आणि मॉडेल आहे. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देतो. सुशांत मृत्यू प्रकरणावरुन त्याने महाराष्ट्रातील अनेक राजकीय मंडळींवर आरोप केले होते. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. परिणामी दिल्लीमध्ये जाऊन मुंबई क्राईम ब्रांचने त्याला अटक केली आहे.

साहिल चौधरी हा यू ट्युब ब्लॉगर आणि मॉडेल आहे. त्यने जस्टिस फॉर ह्युमॅनिटी नावाच्या फेसबुक पेजवरून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची नक्कल केली होती. महाराष्ट्रात त्यांचे सरकार असल्यामुळे कोणीही त्यांचे काही बिघडवू शकत नाही. त्यामुळेच सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात न्याय मिळत नाही. यावरून एका अज्ञाताने साहिलच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलीसांनी लगेच कारवाईही केली. लॉकडाऊनच्या काळात फरीदाबादला आलेल्या साहिलला पकडले आणि मुंबईला घेऊन आले.

साहिलच्या अटकेनंतर कंगना रनौटने ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये गुंडांचं राज्य सुरु आहे. कोणीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारु शकत नाही. जर कोणी प्रयत्न केला तर त्याचं घर तोडलं जातं. सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या साहिल चौधरीला अटक केली. त्याला त्वरित तुरुंगात पाठवलं. पण पायल घोषसोबत लैंगिक गैरवर्तणुक करणाऱ्या अनुरागवर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. हे महाराष्ट्रात काय चाललं आहे, असा प्रश्न कंगनाने केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*