त्यांनी काय नशा करून मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? नितेश राणे यांचा उध्दव ठाकरेंना सवाल


दुसऱ्यांची पिल्लं वाईट मग त्यांनी काय ‘दिनो’च्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली.uddhav thackeray


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दुसऱ्यांची पिल्लं वाईट मग त्यांनी काय ‘दिनो’च्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली.

“गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली. यावर ट्वीटवर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “दुसऱ्यांची पिल्लं वाईट; मग यांनी काय ‘दीनो’च्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग त्या दिशा सॅलीयन केसची चौकशी मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता नि:पक्षपाती होऊ द्या; मग कळेल ‘श्रावणबाळ’ काय दिवे लावतो ते!”

uddhav thackeray

उध्दव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी व्हॅक्सीन जास्त घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज, किती आव, टाचणी तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊ द्या.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था