शरद पवारांना या वयात बांधावर उतरावे लागतेय, हेच महाविकास आघाडीचे अपयश, गोपीचंद पडळकरांची आरोप

शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागतं आहे, हेच या महाआघाडीचं अपयश आहे, अशी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ-सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागत आहे, असे पडळकर म्हणाले.


विशेष प्रतिनिधी

सांगली : शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाआघाडीचं अपयश आहे, अशी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यानी केली आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागत आहे, असे पडळकर म्हणाले.

परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष पवार वयाच्या 79 व्या वर्षीसुद्धा नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. याबाबत पडळकर म्हणाले की, शरद पवार हे सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झालेले आहे. मागच्या दौऱ्यादरम्यान शरद पवार साहेब हे विरोधी पक्षात होते. आता सत्ताधारी असतानाही त्यांना दौरे करावे लागत आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बाहेर पडायला लावा. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आपापल्या भागात लपून बसले आहेत. चीनी व्हायरसच्या काळातही हे मंत्री घराबाहेर पडले नव्हते, अशी टीकाही पडळकर यांनी केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*