शरद पवारांच्या मुलाखतीने खळबळ, छे…ही तर राऊतांची वळवळ, निलेश राणेंची टीका


शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीची चर्चा सुरू आहे. या मुलाखतीमुळे देशात खळबळ माजेल असा दावा राऊत यांनी केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी यामुळे कोणतीही खळबळ माजणार नाही, ही तर राऊत यांची वळवळ असल्याची प्रतिक्रीया दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीची चर्चा सुरू आहे. या मुलाखतीमुळे देशात खळबळ माजेल असा दावा राऊत यांनी केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी यामुळे कोणतीही खळबळ माजणार नाही, ही तर राऊत यांची वळवळ आहे, अशी प्रतिक्रीया दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध होणार आहे.

स्वत: संजय राऊत यांनीच या संदर्भात एक ट्विट केले होते. देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात ती प्रसिद्ध होईल आणि वृत्त वाहिन्यांवर पाहता येईल…चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडींपर्यंत पवार जोरदार बोलले…असे त्यांनी म्हटले होते.

मात्र, राऊत यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या निलेश राणे यांनी यावरुन चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ट्विटद्वारेच त्यांनीही राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख करून राणे म्हणतात, पवारांच्या मुलाखतीनं खळबळ वगैरे काही माजणार नाही. ही फक्त राऊत यांची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन त्यातल्या काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग,’ असा सवाल नीलेश राणे यांनी केला आहे.

‘लोकं चिडली आहेत, यांच्या इंटरव्यूमध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. खरं कौशल्य लढण्यात असतं, बोलण्यात नसतं,’ असा टोलाही नीलेश राणे यांनी लगावला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था