मराठा आरक्षण स्थगितीवर उत्तर देणे पवारांनी टाळले, कांदा प्रश्नावर मात्र मोदी सरकारवर टीका


विशेष प्रतिनिधी

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवडयांसाठी पुढे ढकलली आहे. मात्र, या मुद्यावर पुण्यात पत्रकारांना उत्तर देणे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आज खुबीने टाळले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडली.maratha reservation latest news

मात्र, सुरवातीला सरकारी वकील मुकुल रोहोतगी हे काही काळ गैरहजर राहिल्याने सुनावणी थोडा वेळ पुढे ढकलण्यात आली. नंतर राज्य सरकारच्या गोलमाल भूमिकेमुळे ही सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली. त्यावर भाजपाकडून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. याच विषयावर पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळले.

शरद पवार पुण्यात आहेत. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले. ते म्हणाले, “मी उद्या नाशिकला जाणार असून कांदा उत्पादकांना भेटून त्यांची भूमिका जाणून घेणार आहे तसेच केंद्र सरकारची भूमिका ही शेतकर्‍यांच्या हिताची आहे असें वाटत नाही.

maratha reservation latest news

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे नेते सुरेश धस यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था