आफ्रिदी वेडा झाला आणि बरळला…शोएब अख्तरसमोर सचिनचे पाय थरथरायचे; सोशल मीडियात अफ्रिदी बनला टिंगलीचा विषय


चीनी व्हायरसने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्या डोक्यावरच परिणाम केल्यासारखे झाले आहे. त्यामुळे सतत बरळणाऱ्या शाहिद आफ्रिदीने मास्टर ब्लास्टर सचिनवर शिंतोडे उडविले आहे. शोएब अख्तर गोलंदाजी करण्यास आला की सचिनचे हात पाय थरथरत असत, या अफ्रिदीच्या नव्या वक्तव्याने जगभरच्या क्रिकेटप्रेमींमध्ये हास्याची लाट उसळली असून अफ्रिदी टिंगलीचा विषय बनला आहे.


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : चीनी व्हायरसने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्या डोक्यावरच परिणाम केल्यासारखे झाले आहे. त्यामुळे सतत बरळणाऱ्या शाहिद आफ्रिदीने मास्टर ब्लास्टर सचिनवर शिंतोडे उडविले आहे. शोएब अख्तर गोलंदाजी करण्यास आला की सचिनचे हात पाय थरथरत असत, असा हास्यास्पद दावा अफ्रिदीने केला आहे.

आफ्रिदीचे नवे पुस्तक लवकरच येत आहे. या पुस्तकात आफ्रिदीन म्हटले आहे की, सचिन हा शोएबला घाबरत होता हे मी स्वत: पाहिले आहे. सामना सुरू असताना मी स्वेअर लेगला उभा होतो. अख्तर गोलंदाजी करण्यास आला की सचिनचे हात पाय थरथरत असत.

जेव्हा तुम्ही मिड ऑफ किंवा कव्हर्सवर फिल्डिंगला उभे असता तेव्हा खेळाडूच्या बॉडी लॅग्वेजवरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतात. तुम्हाला सहज लक्षात येते की फलंदाज दबावात आहे. शोएबने सचिनला घाबरवले नाही. पण त्याची गोलंदाजी अशी होती की जगातील सर्व सर्वोच्च फलंदाज सचिनसह सर्व जण बॅकफुटवर गेले.

सचिन स्वत: ही गोष्ट मान्य करणार नाही की मी घाबरत होतो. शोएबच्या काही स्पेल अशा असायच्या की सचिन नाही तर जगातील सर्वच फलंदाज घाबरत, असेही आफ्रिदीने या विषयावर बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वी आफ्रिदीला चीनी व्हायरसची बाधा झाली होती. तेव्हापासून तो सतत बरळत आहे. पंतप्रधान मोदींवरही त्याने अत्यंत अश्लाघ्य टीका केली होती. पाकव्याप्त काश्मीरची क्रिकेटची टीम बनावी.

आपल्याला या टीमचे नेतृत्व करण्यास आवडेल, असेही तो म्हणाला होता. चारच दिवसांपूर्वी आफ्रिदी म्हणाला होता की, पाकिस्तान संघाकडून भारताचा नेहमी पराभव झाला आहे.प्रत्येक पराभवानंतर भारतीय खेळाडू माझ्याकडे येऊन माफी मागत असत. सचिन सईद अजमलच्या गोलंदाजीलाही घाबरत होता, असेही तो म्हणाला आहे.

दरम्यानच्या सचिनबाबत अफ्रिदीने केलेल्या या दाव्यामुळे क्रिकेटप्रेमींना मात्र हसू आवरणे मुश्किल झाले आहे. जेमतेम सतरा वर्षांचाही नसताना सचिनने इम्रान खान, वकार युनूस, वासिम अक्रम या पाकिस्तानच्या सार्वकालिक महान वेगवान गोलंदाजांचा पाकिस्तानात जाऊ धीराने सामना केला होता. सचिनच्या त्यावेळच्या इनिंग्नजचे कौतुक या सर्व गोलंदाजांनी वारंवार केले आहे. एवढेच नव्हे तर शोएब अख्तरला देखील विश्वचषकाच्या महत्वाच्या सामन्यांमध्ये मैदानाबाहेर भिरकावून देण्याची कामगिरी करत भारताला विजयपथावर नेण्याचे काम सचिनने केले होते. या पार्श्वभूमीवर सचिनबद्दलचा अफ्रिदीचा दावा हास्यास्पद ठरला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती