राजदचे बिहारमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज, सर्वाधिक कलंकित उमेदवार


बिहारमध्ये खून, अपहरणापासून ते दरोड्यांपर्यंतचे जंगलराज माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या काळात जनतेने अनुभवले होते. आता त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही हाच कित्ता गिरवत २० कलंकित उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.bihar election 2020


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमध्ये खून, अपहरणापासून ते दरोड्यांपर्यंतचे जंगलराज माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या काळात जनतेने अनुभवले होते. आता त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही हाच कित्ता गिरवत २० कलंकित उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.

लालूंच्या राज्यात बिहारमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी वाढली होती. गुंडांना राजाश्रय मिळाला होता. बिहारसाठी ते ‘अंधारयुग’ मानले जात होते. ‘जंगलराज’ची उपाधीही याच काळात मिळाली होती. तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीला सामोरे जाताना आता पुन्हा गुंडगिरीचाच फॉर्म्युला वापरण्याचे ठरविले आहे.

बिहारच्या मोकामा विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. येथील कलंकित उमेदवार अनंत सिंह यांच्याविरोधात ३८ खटले आहेत. जदयूचे राजीव लोचन नारायण सिंह त्यांच्या विरेधात निवडणूक मैदानात उतरले आहेत. एकूण उमेदवारांत सर्वाधिक खटले अनंत यांच्यावर आहेत. त्यांच्यावर हत्या, अपहरण, बेकायदा शस्त्रे बाळगणे, खंडणीसारखे आरोप आहेत. दुसरीकडे राजीव लोचन यांच्यावर अपशब्द बोलल्याचादेखील आरोप नाही.

bihar election 2020

राजीव लोचन हे पूर्वाश्रमीचे शेतकरी नेते आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ नेत्याची राहिली आहे. त्यांचे वडील माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र होते. अनंत सिंह २००५ व २०१५ च्या निवडणुकीत जदयूच्या तिकिटावर विजयी झाले होते. २०१५ मध्ये त्यांच्यावर हत्येचा आरोप होता. त्यामुळे जदयूने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तेव्हा अनंत सिंह यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांनी जेडीयूच्या उमेदवारास १८ हजार मतांनी पराभूत केले. आता ते राजदकडून लढत आहेत.

अनंत यांच्यानंतर बिहारमध्ये ७१ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २८ रोजी मतदान होईल. यात १०६५ उमेदवार उभे आहेत. राजदने सर्वाधिक २९ कलंकितांना उमेदवारी दिली. भाजप-लोजपाने प्रत्येकी २१ उमेदवार उतरवले. मोकामा मतदारसंघातून अनंत सिंह यांच्यानंतर दुसर्या स्थानी सुधीरकुमार वर्मा आहेत. त्यांच्यावर ३७ खटले आहेत. सुधीर गुरूआ मतदारसंघातून लढत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती