ड्रग्ज कनेक्शनवर बोलणाऱ्या खासदार रवीकिशन यांना धमक्या, सरकारने दिली सुरक्षा

बॉलीवुडमधील ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा मांडणारे भोजपुरी सिनेसृष्टीचा तारा आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रविकिशन यांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. बॉलिवुडमधले कलाकार अमली पदार्थ सेवन करत असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी असा आग्रह त्यांनी धरला होता.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलीवुडमधील ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा मांडणारे भोजपुरी सिनेसृष्टीचा तारा आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रविकिशन यांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. बॉलिवुडमधले कलाकार अमली पदार्थ सेवन करत असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी असा आग्रह त्यांनी धरला होता.

अभिनेत्री कंगना रनौतने सर्वप्रथम जाहीरपणे बॉलिवूडमधले अनेक कलाकार अमली पदार्थ सेवन करत असल्याचा उच्चार केला होता. तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे काही कलाकारांची अप्रत्यक्ष नावेही घेतली होती. त्यानंतर रिया चक्रवर्तीसह अनेकांना अटक केली गेली.

सुशांतसिह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडला असलेला ड्रग्जचा विळखा कसा घट्ट होतो आहे यावर कंगनाने भाष्य केलं होतं. तिच्या या बोलण्याची दखल संसदेत घेतली गेली. अभिनेता रविकिशनने राज्यसभेत या अमली पदार्थाबद्दल भाष्य केलं होतं.

रविकिशन हा भोजपुरी सिनेमाचा तारा तर आहेच. संसदेत त्याने या ड्रग्ज माफियांचा पदार्फाश करण्याची मागणी केली होती. त्यावर जया बच्चन यांनी बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा डाव असून संपूर्ण इंडस्ट्री अशी नसल्याचा उच्चार केला होता. त्यानंतर जया बच्चन यांच्याबद्दल बोलताना आपल्याला पुरेसा आदर असून मुद्दा बॉलिवूडमधली घाण साफ करण्याचा आहे असं रविकिशन म्हणाला होता.

रविकिशनने त्यानंतर अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखतीही दिल्या होत्या. पण त्यानंतर मुंबईसह अनेक ठिकाणहून त्याने केलेल्या वक्तव्यांबाबत चीड व्यक्त करण्यात आली. त्याला अनेक फोन आले. त्यात काही धमक्यांचे फोनही होते. त्याच्या फोनची दखल घेऊन त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविकिशनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे याबद्दल ट्विटरवर आभारही मानले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*