राष्ट्रवादीची नवी चाल, बंडखोर नगरसेवकांच्या पत्राआडून शिवसेनेच्या विजय औटींवर निशाणा


राष्ट्रवादीला २००४ पासून पारनेर तालुक्यातून उखडून टाकणाऱ्या शिवसेनेवर निशाणा साधण्याची नवी चाल खेळण्यात आली आहे. शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. पारनेरमधून शिवसेना उखडून टाकण्यात राष्ट्रवादीपुढे आता केवळ औटी यांचाच अडसर आहे.


विशेष प्रतिनिधी

नगर : राष्ट्रवादीला २००४ पासून पारनेर तालुक्यातून उखडून टाकणाऱ्या शिवसेनेवर निशाणा साधण्याची नवी चाल खेळण्यात आली आहे. शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघात औटी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला कायमच दणका दिला. एकेकाळी शरद पवार यांचे समर्थक असलेल्या औटी यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सलग तीन वेळा ते निवडून आले होते. विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने २०१९ साली शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेले निलेश लंके यांना उमेदवारी दिली आणि औटी यांचा पराभव झाला. आता पारनेरमधून शिवसेना कायमची उखडून टाकण्यासाठी राष्ट्रवादीपुढे मुख्य अडथळा औटी यांचाच असल्याने बंडखोर नगरसेवकांच्या पत्राआडून त्यांच्यावर वार केला जात आहे.

नगरसेवकांनी लिहिलेल्या पत्रात औटी यांचे वडील भास्करराव औटी हे सुमारे साठ वर्षांपूर्वी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार असल्याचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे विजय औटी यांचीही विचारधारा कम्युनिस्ट असल्याचे या नगरसेवकांनी म्हटले आहे. नगरसेवकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नगरपंचायतीच्या कारभाराबाबत औटी यांनी नेहमीच स्वयंकेंद्रीत राजकारण केल्यामुळे गेल्या साडेचार वर्षात शहरात काहीही विकास होऊ शकला नाही. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षे शिवसेनेच्या ताब्यात सत्त्ता होती.

नगरविकास खात्याकडे मोठा निधी असूनही औटी यांनी नगरपंचायतीस जाणीवपूर्वक निधी उपलब्ध करुन दिला नाही. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष निवडीच्या वेळी काही नगरसेवक नाराज होते. त्याची कल्पना औटी यांना होती. तरीही औटी यांनी त्या नगरसेवकांना रोखले नाही. परिणामी नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेच्या हातून गेली. पारनेरचे पहिले आमदार कम्युनिस्ट पक्षाचे भास्कराव औटी यांचे विजय औटी हे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांची विचारसरणीही आजही डावीच आहे. 1985 मध्ये औटी यांनी समाजवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, त्यात ते पराभूत झाले. पुढे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकरण करताना त्यांनी नेहमीच शिवसैनिकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या.

पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळणे दुरापास्त असल्याने औटी यांनी स्वत:च्या स्वाथार्साठी 2004 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिकांच्या जीवावर औटी विजयी झाले व त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना पुन्हा विचारलेच नाही. काही काम घेऊन गेलेल्या शिवसैनिकांना त्यांनी नेहमीच अपमानित केले. त्याउलट खुशमस्करी करणाऱ्या, शिवसेनेशी निष्ठा नसणाऱ्यांना त्यांनी नेहमीच सन्मान दिला, पदे दिली. कम्युनिस्ट, काँग्रेस विचारसरणीला पाठबळ दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत कम्युनिस्ट, काँग्रेस उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या.

शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दिले. 2004 मध्ये शिवसेनेचा आमदार झाला. तेव्हापासून आजपर्यंत औटी यांनी शिवसेनेची एकही शाखा उघडू दिली नाही. तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी शाखा सुरु करण्याची भूमिका घेतल्यावर त्यांनाही अपमानित करण्यात आले. शिवसेना पक्ष वाढवण्याऐवजी स्वत:च्या नातेवाईकांना बळ देण्यासाठी इतर पक्ष जिवंत कसे राहतील याची त्यांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता विजय औटी हे दर्शनालाही आले नाहीत. शिवसैनिकांचे श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही उपक्रम राबवले नाहीत, असा भावनिक आरोपही पत्रात करण्यात आला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती