रामजन्मभूमी चळवळीबाबत विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध : अडवाणी

  • सबको सन्मती दे भगवान : मुरली मनोहर जोशी

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : बाबरी मशीद प्रकरणी लखनऊच्या विशेष न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अडवाणी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले असून आपण आनंदी असल्याचं म्हटलं आहे. निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत आपला विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अडवाणी यांनी म्हटलेय की, “बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपाचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते”.

बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष लागले होते. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगितले.

विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचे निदर्शनात आल्याचे न्यायालयाने यावेळी सांगितले.

न्यायालयाच्या निर्णयानंतर मुरली मनोहर जोशी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “न्यायालयाच्या निकालानंतर आता हा वाद संपला पाहिजे. आमचे आंदोलन कोणत्याही षडयंत्र नव्हते हे सिद्ध झाले. आम्हाला खुप आनंद झाला आहे. न्यायालयानं आता हा निर्णय दिला असून हा वाद संपला पाहिजे. संपूर्ण देशाला राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला लागलं पाहिजे,”

“राम मंदिराचं आंदोलन एक ऐतिहासिक क्षण होता. आज न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुरूवातीपासून आम्ही प्रत्येक जे सत्य होतं तेच न्यायालयासमोर मांडलं. सर्व वकिलांच्या मेहनतीमुळे आणि लोकांच्या साक्षीमुळे हा निर्णय आज आला आहे. आता राम मंदिराच्या उभारणीचं कार्य सुरू होणार आहे. जय सिया राम, सबको सन्मती दे भगवान,” असेही ते म्हणाले.

Babri Masjid. *** Local Caption *** Babri Masjid. Express archive photo

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*