प्रियांका गांधींचा बंगला वाचविण्याचा प्रयत्न करणारा काँग्रेसचा नेता कोण?


हरदीप पुरींना काँग्रेस नेत्याचा फोन; प्रियांका गांधींकडून मात्र इन्कार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांना सरकारी बंगला सोडावा लागू नये, यासाठी काँग्रेसमधल्या नेत्यांनी मशक्कत सुरू केली असताना त्याबद्दल उलट – सुलट दावे करणे सुरू झाले आहे.

प्रियांका गांधींना ३५ लोधी इस्टेट बंगला सोडावा लागू नये यासाठी काँग्रेस पक्षातून प्रयत्न सुरू झाले. हे प्रयत्न exposed होताच प्रियांका गांधींनीच ती फेक न्यूज असल्याचे ट्विट करून या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर नागरी हवाई वाहतूकमंत्री आणि नगर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांचे ट्विट आले,

“काँग्रेसमधल्या एका वजनदार नेत्याचा मला ४ जुलैला दुपारी १२.०५ वाजता फोन आला. ३५, लोधी इस्टेट या बंगल्याची दुसऱ्या काँग्रेस खासदाराच्या नावावर नोंदणी करावी त्यामुळे प्रियांका गांधी तेथेच राहू शकतील. हा विषय कोणी खळबळजनक बनवू नये.”

प्रियांका गांधी आणि हरदीपसिंग पुरी यांच्या परस्पर विरोधी ट्विटनंतर या विषयाला फाटे फुटले. दोन्ही बाजूंनी ट्विटर युद्ध रंगले. प्रियांका समर्थकांनी फोन करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान दिले. तर प्रियांका गांधींचे तथाकथित status वाचविण्यासाठी काँग्रेस नेते ही मशक्कत करत आहेत, असा आरोप भाजप नेते करीत आहेत. हरदीप पुरी हे फोन करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे नाव सांगत नाहीत. प्रियांका गांधी यांची बदनामी करण्यासाठी ते selective leak करताहेत, अशा आशयाची ट्विट काँग्रेस समर्थकांनी केली आहेत.

वास्तविक प्रियांका गांधी यांना नियमानुसार ३५, लोधी इस्टेट हा बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे. त्या कोणत्याही सरकारी पदावर नाहीत. त्यांची विशेष SPG सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना ३५, लोधी इस्टेट हा बंगला १ ऑगस्टपर्यंत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. “मी १ ऑगस्टपर्यंत बंगला खाली करणार आहे.,” असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था