पंतप्रधानांचा फोटो पोस्टरवर वापरल्यास गुन्हा, भाजपाची बिहारमध्ये भूमिका

बिहार विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळण्यासाठी लोकजनशक्ती पक्षाविरुध्द भारतीय जनता पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. एनडीएशिवाय इतर पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्टरवर वापरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.


वृत्तसंस्था

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळण्यासाठी लोकजनशक्ती पक्षाविरुध्द भारतीय जनता पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. एनडीएशिवाय इतर पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्टरवर वापरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

बिहार विधानसभेसाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) जागावाटप निश्चित झाल्याची घोषणा दोन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. यात संयुक्त जनता दल (जेडीयू) १२२ तर १२१ जागांवर भाजप लढणार आहे. नितीश यांच्या नेतृत्वावरून नाराजी व्यक्त करीत एनडीएतून बाहेर पडलेल्या ‘लोक जनशक्ती पक्षा’सहीत इतर विरोधी पक्षांविरोधात कडक भूमिका घेण्यात आलीय.

एनडीएशिवाय इतर कोणत्याही विरोधी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरचा वापर प्रचारासाठी करण्यात आला तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराच भाजपकडून देण्यात आलाय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी म्हटले आहे की, कोणत्याही पक्षाकडून पंतप्रधान मोदी किंवा पक्षाच्या इतर स्टार प्रचारकाच्या पोस्टरचा वापर करताना आढळला तर निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली जाईल व याविरोधात कारवाई निश्चित केली जाईल.

बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा सज्जड इशारा दिला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*