प्रवीण दरेकर यांच्याविरुधद सुडाचे राजकारण, दबाव टाकण्यासाठी बॅंकेची चौकशी

राज्यातील विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारविरुध्द आवाज उठविणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात सुडाचे राजकारण सुरू करण्यात आले आहे. आपल्यावर दबाव टाकण्यासाठी मुंबई बॅंकेची चौकशी सुरू झाली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारविरुध्द आवाज उठविणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सुडाचे राजकारण सुरू करण्यात आले आहे. आपल्यावर दबाव टाकण्यासाठी मुंबई बॅंकेची चौकशी सुरू झाली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँक) चौकशीचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी जारी केले आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेची विविध सहा मुद्यांवर तपासणी करण्यासाठी सहकार विभागाने तीन अधिकाऱ्यांचे पथक पाठविले आहे.

त्याबाबत दरेकर म्हणाले की, चीनी व्हायरस, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेता म्हणून सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवत आहे. तसेच साखर कारखान्यांच्या थकहमीचे पैसे मागितल्यामुळे सरकारचा अहंकार जागा झाला आहे. त्यातूनच आपले तोंड बंद करण्यासाठी आपण अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेची चौकशी सुरू केली आहे.

विरोधी पक्षनेता म्हणून आपण लोकांचे प्रश्न मांडण्याचे आणि सरकारला धारेवर धरण्याचे काम करीत आहे. केवळ राजकारणापोटी बँकेस त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र बँकेत कोणतीही अनियमितता किं वा गैरव्यवहार नसून बँक नफ्यात आली आहे.

मुंबई बँकेची काही थकीत कर्जे झाल्यामुळे तोटा ४७ कोटींवर गेला होता. मागच्या एक-दीड महिन्यामध्ये बँकेच्या संपूर्ण संचालक मंडळाने मेहनत करून आता ३० सप्टेंबरपर्यंत बँक नफ्यामध्ये आली असल्याचे सांगून दरेकर म्हणाले, कारखान्यांना दिलेल्या कॉपोर्रेट कर्जाची चौकशी सरकारला करायची आहे. मात्र कारखान्यांना दिलेल्या कर्जापोटी बँकेला सव्वाशे कोटींचा नफा झाला आहे. तसेच आम्ही थकहमीचे पैसे मागितले हे सरकारचे दुखणे आहे. त्याच्या रागातूनच ही चौकशी लावण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा महत्त्वाचा मुद्दा असून या संदर्भात आम्ही नाबार्डकडे जाऊन भूमिका स्पष्ट केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*