पार्थसाठी केलेला अजितदादांचा “पारनेर प्रयोग” फसला; नार्वेकरांच्या मुत्सद्देगिरीला यश; राष्ट्रवादीत गेलेले ५ नगरसेवक शिवसेनेत परतणार!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपले चिरंजीव पार्थ यांच्यासाठी अजित पवारांनी केलेला “पारनेर प्रयोग” अखेर फसला. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतणार आहेत. हे पाचही नगरसेवक मुंबईत असून मातोश्रीवर जाऊन ते शिवसेनेत प्रवेश करतील. या प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आल्याचे मानले जात आहेत. नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन २० मिनिटे चर्चा केली.

पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मुख्यमंत्री यावरुन नाराज झाल्याने स्वत: शरद पवारांना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे लागले होते. काल अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर आज हे पाचही नगरसेवक शिवसेनेत परतणार आहेत.

पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी ४ जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती इथे हा प्रवेश झाला. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज बारामतीत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पारनेर तालुक्यातील शिवसेनेतून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना बरोबर आणत थेट राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला.

पारनेर नगरपंचायतीच्या नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात आज एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार आणि मंत्री विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला गेला. परंतु या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला.

पारनेरच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक स्तरावरचा विषय होता, तो त्या पातळीवरच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही, अशी मखलाशी राऊत यांनी केली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती