ओलींची नेपाळमध्येच टिंगल, प्रभु रामचंद्र बीरगंजचे तर ‘शरयू’ कोठेय?


भारताने नेपाळवर सांस्कृतिक अत्याचार केल्याचा आरोप करताना प्रभु रामचंद्र हे नेपाळमधील होते असे वादग्रस्त वक्तव्य करणारे पंतप्रधान केपी शर्मा ओली नेपाळी जनतेतच टिंगलीचा विषय बनले आहेत.


विशेष प्रतिनिधी

काठमांडू : भारताने नेपाळवर सांस्कृतिक अत्याचार केल्याचा आरोप करताना प्रभु रामचंद्र हे नेपाळमधील होते असे वादग्रस्त वक्तव्य करणारे पंतप्रधान केपी शर्मा ओली नेपाळी जनतेतच टिंगलीचा विषय बनले आहेत.

 खरी अयोध्या नेपाळमधील बीरगंजजवळ असून तेथेच श्रीरामांचा जन्म झाल्याचा दावा त्यांनी ओली यांनी केला होता. नेपाळचे माजी पंतप्रधान बाबू राम भट्टराय म्हणाले, आदि कवी ओलींचे कलियुगातील नवे रामायण ऐका, थेट वैकुंठधामच्या प्रवासाला निघा.

माजी परराष्ट्रमंत्री रमेशनाथ पांडे म्हणाले, खरी अयोध्या बीरगंजजवळ आहे तर शरयू नदी कुठे आहे? धर्म राजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे. हे विधान अत्यंत लाजिरवाणे आहे. तसेच ओलींना अशा प्रकारचे विधान करून भारत आणि नेपाळमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न न करता ते आणखी बिघडवायचे आहेत, अशी टीका राष्ट्रीय प्रजातंत्र पाटीर्चे अध्यक्ष कमल थापा यांनी केली आहे.

ओलींच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत त्रिभुवन विद्यापीठातील प्राध्यापक कुंदन आर्यल ट्विट करत म्हणाले, ओलींची भारतीय वाहिन्यांशी स्पर्धा आहे का? तर, ओलींच्या पक्षाचे नाव कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ आहे. कम्युनिझम म्हणजे साम्यवाद. जे देवाला मानत नाही. ओलींनी शपथ घेतानाही देवाचे नाव घेण्यास नकार दिल्याचे ज्येष्ठ पत्रकार धरुबा अधिकारी यांनी म्हटले आहे.

नेपाळमधील नागरिकांनी पंतप्रधानांच्या विधानाची थट्टा उडवल्यानंतर तेथील परराष्ट्र मंत्रालयाला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. हे विधान कुठल्याही राजकीय मुद्द्याशी संबंधित नव्हते. तसेच कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याची सारवासारव मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती