नेपाळचे पंतप्रधान ओली संकटात, कम्युनिस्ट पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

भारताविरुध्द सीमेवरून वाद निर्माण करणारे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यावर जनतेबरोबरच त्यांच्या स्वत:च्या पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ओली यांचे पद संकटात आले असून कम्युनिस्ट पक्षामध्येही फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


वृत्तसंस्था

काठमांडू : भारताविरुध्द सीमेवरून वाद निर्माण करणारे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यावर जनतेबरोबरच त्यांच्या स्वत:च्या पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ओली यांचे पद संकटात आले असून कम्युनिस्ट पक्षामध्येही फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताबरोबर संघर्षाची भूमिका घेऊन ओली यांनी नवा नकाशा मंजूर करून घेतला. भारताचा काही भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखविला आहे. मात्र, या सगळ्यातून नेपाळला चीनची गुलामी करावी लागणार असल्याचे नागरिकांना वाटू लागले आहे. चीनच्या राजदुतांना नेपाळच्या राजकारणात प्रचंड महत्व निर्माण झाले आहे. त्यांच्याच बंगल्यात पक्षाच्या बैठका होत असल्याने नागरिकांमधील रोष आणखीनच वाढला आहे.

त्यामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षात गंभीर पेच निर्माण झाला असून पक्षात लवकरच मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. आता पक्षाच्या अध्यक्षपदावरून आणि पंतप्रधानपदावरून आपल्याला दूर करण्यासाठी कट रचण्यात येत आहे, मात्र आपण तसे होऊ देणार नाही. सत्तारूढ पक्षात गंभीर पेच निर्माण झाला आहे, असेही ओली यांनी सांगितले.

ओली यांच्या वक्तव्यानंतर पुष्पकमल दहल प्रचंड, माधव नेपाळ आणि झालालंथ खानल या तीन माजी पंतप्रधानांनी भंडारी यांची भेट घेतली आणि त्यांना पदावरून दूर करण्यासाठी कट रचण्यात येत असल्याच्या पसरलेल्या अफवा खऱ्या नसल्याचे सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*