नाथाभाऊंच्या प्रवेशाची गणिते राज्यपालांच्या भूमिकेवरच!

विशेष प्रतिनिधी

पारोळा(जळगाव) : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात सध्या इन्कमिंग सुरु आहे. पण नाथाभाऊंच्या प्रवेशाची गणिते राज्यपालांच्या भूमिकेवरच अवलंबून असल्याचे माजी पालकमंत्री डॉ.सतिश पाटील यांनी स्पष्ट केले.

पारोळामध्ये एका कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या नेहमीच्या शैलीत डॉ.पाटील यांनी सध्याच्या राजकीय हालचालीवर भाष्य केले. या कार्यक्रमाला खासदार उन्मेश पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. तसेच पारोळ्यातील ट्रॉमा केअर सेंटर अद्यावत करण्यासाठी पाठपुराव्याची गरज असल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

पुन्हा खडसेंचा प्रवेशावर उधाण

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे प्रवेशाबाबत बैठक घेतली होती. यावेळी जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी खडसे विषयी नकारात्मक बूमिका तर काहींनी खडसे आल्यास संघटन मजबूत होईल. अशी भूमिका घेतली होती. पण आता पुन्हा खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश या चर्चेला उधान आले असून राष्ट्रवादीचे नेते भाषणातून खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत देत आहे.

कार्यकर्ते देखील वेट अँन्ड वॉच

एकनाथ खडसे यांची कार्यकर्त्यांशी संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर खडसेंनी यावर भाष्य करणे टाळले होते. भाजपच्या नेत्यांनी तातडीने ऑनलाईन बैठकीतून खडसेंशी संवाद साधून चर्चा केली. त्यामुळे खडसे समर्थक देखील खडसे प्रमाणे आता वेट अँन्ड वॉच करत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*