मुंबईत महिलेवर तीन तरुणांचा बलात्कार; अ‍ॅसिड टाकण्याचीही धमकी

  • आरोपी फैय्याज शेख, साजिद पटेल यांना अटक; तिसरा आरोपी नदीम फरार
  • सतत दोन वर्षे धमकी देत बलात्कार; व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल
  • आरोपींपासून बचाव करण्यासाठी महिला मुंबई सोडून गावात निघून गेली

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईच्या दिंडोशी येथे दोन वर्षांपासून २२ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करून यातील दोन आरोपींना अटक केली. तिसर्‍याचा शोध घेण्यात येत आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले आहे की आरोपींनी तिला बलात्काराचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले आणि याबद्दल कुणाला सांगितले तर अॅसिड टाकण्याची धमकीही दिली. या कारणास्तव, ती इतके दिवस गप्प राहिली. या प्रकरणात पोलिसांनी 31 वर्षीय फय्याज शेख आणि २७ वर्षीय साजिद पटेल याला अटक केली असून तिसरा आरोपी नदीम फरार आहे.

आरोपी फैय्याज शेख, साजिद पटेल व नदीमचे या महिलेच्या घरी येणे-जाणे होते. पीडिता आपला पती आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत मलाड ईस्ट परिसरात राहत होती. फैयाज शेखही महिलेच्या शेजारी राहायचा. दोन वर्षांपूर्वी त्याने महिलेला आपल्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. छुप्या कॅमेऱ्याने तिचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत नंतरही तिघंनी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

बलात्कारापासून बचाव करण्यासाठी या महिलेने मुंबई सोडली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक डीएस कांबळे यांनी सांगितले की, या घटनेच्या एक वर्षानंतर फैयाज शेखने व्हिडिओ आपला मित्र सादिक पटेल आणि नादिमला शेअर केला. नंतर दोघांनी इंटरनेटवर व्हिडिओ अपलोड करणे आणि तिच्या पतीला याची माहिती देण्याची धमकी देत महिलेवर अनेकवेळा बलात्कार केला. महिलेने या ब्लॅकमेलिंगपासून बचाव करण्यासाठी मुंबई सोडली. मात्र आरोपींनी तिला शोधत गावही गाठले. यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाल. महिलेने दोन वर्षांपासून होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*