मोदींच्या पाटण्यातील सभेत बॉम्ब फेकणार्‍या आफताब अलमला काँग्रेस महागठबंधनचे तिकीट

  • उमेदवारी अर्ज भरतानाच पोलिसांनी केली अटक

वृत्तसंस्था

ओरिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाटण्यात 2013 मध्ये झालेल्या सभेत बॉम्ब फेकणार्‍या आफताब आलमला काँग्रेस महागठबंधनमधील भारतीय कम्युनिस्ट पार्टीने विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले. तो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आला असतानाच बिहार पोलिसांनी त्याला अटक केली.

आफताब आलम बॉम्ब फेकण्याच्या आरोपावरून तुरुंगात होता. तो जामिनावर सुटताच पाकिस्तानला पळून गेला. तेथे त्याने पाकिस्तानी मुलीशी लग्न केले. परंतु भारतातील समाजकंटकांचे आणि गुंडांची त्याचे संबंध त्याने कायम ठेवले.

बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनची घोषणा होताच त्याने ओरिया विधानसभा मतदारसंघातून गठबंधनचे तिकीट मागितले. हा मतदारसंघ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला आला आहे. त्या पक्षाने आफताब आलमची उमेदवारी जाहीर केली. तो ओरिया तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आफ्ताबने अर्ज भरण्यापूर्वी त्याला अटक केली.

दहशतवादी गुंड यांना यांना पक्ष्यांमध्ये घेऊन घेऊन तिकिटे देण्याची काँग्रेसी प्रवृत्ती महागठबंधनच्या राष्ट्रीय जनता दल कम्युनिस्ट आदी पक्षांमध्ये ही पसरली आहे/ मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो घरात ठेवणाऱ्या मसुरीला काँग्रेसने यापूर्वीच तिकीट दिले होते यातून काँग्रेसची जिहादी मानसिकता लक्षात येते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*