काळ्या कमाईची साधने संपलीत म्हणून विरोधकांकडून पेटवापेटवी : मोदी

  • पंतप्रधान म्हणाले, “मशीन पेटवणारे लोक शेतकऱ्यांचा अपमान करतहेत”
  • युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे दिल्लीत इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर जाळून आंदोलन

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : शेतकर्‍यांशी संबंधित नवीन कायद्यांना विरोधी पक्ष कडाडून विरोध करत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना सटकवले आहे. कृषी विधेयकवरून निषेध करणारे लोक यंत्र मशीन व उपकरणे पेटवून शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. कारण, शेतकरी शेतीशी संबंधित साधनांची पूजा करतात, अशी टीका मोदींनी केली आहे.

पंजाबमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर जाळून आंदोलन केले होते. त्यावर मोदींनी हे टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नमामी गंगे मिशन उत्तराखंडच्या ६ मेगा प्रोजेक्ट लॉन्च करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हटले की, ‘ते लोक अनेक वर्षांपासून म्हणत होते की, न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) लागू करतील, मात्र त्यांनी केले नाही. आता आमच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार एमएसपी लागू केले. तर आता काही लोक विरोध करत आहेत, कारण त्यांच्या काळ्या कमाईचे साधन आता संपले आहे.”

‘मध्यस्थांना फायदा व्हावा ही विरोधकांची इच्छा आहे’

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या आठवड्यात संपलेल्या संसद अधिवेशनात शेतकरी, कामगार आणि आरोग्याशी संबंधित बर्‍याच सुधारणा करण्यात आल्या. शेतकरी आता आपले पीक कोठेही आणि कोणासही विकू शकतात. केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत आहे, तेव्हा काही लोक निषेध करत आहेत. अशा लोकांना वाटत नाही की, शेतकऱ्यांनी आपली उत्पादने खुल्या बाजारात विकावीत. त्यांना वाटते की, मध्यस्थांना फायदा होत राहावा. अशा प्रकारे ते शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याला विरोध करत आहेत.

‘या लोकांनी बर्‍याच वर्षांपासून आपल्या सुरक्षा दलाला बळकट करण्यासाठी काहीही केले नाही. एअरफोर्सने राफेलची मागणी केली पण त्यांनी कधीच ऐकले नाही. जेव्हा आमच्या सरकारने फ्रान्सबरोबर राफेल करारावर स्वाक्षरी केली तेव्हा त्यांना त्रास होऊ लागला. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपल्या शूर सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले होते, परंतु विरोधक पुरावा विचारत होते. सर्जिकल स्ट्राइकचा विरोध करत त्यांनी देशासमोर आपले मनसुबे जाहीर केले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*