`सभा के चारो और बम है` फडणवीसांच्या कार्यक्रमात आली धमकी आणि उडाली खळबळ!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : येथे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थितीत कार्यक्रम होता. तत्पुर्वी माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने हिंदीत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली. त्यांतर एक कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी करणारा मेसेज आला अन् सभास्थळी चांगलीच खळबळ उडाली.

या घटनेबाबत दीपक तायडे यांनी तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे,की मंगळवारी बीओटी कॉम्प्लेक्समध्ये विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असतांना तायडे यांच्या भ्रमणध्वनीवर दुपारी तीन वाजून १८ मिनिटांनी एक कॉल आला. तो त्यांनी रिसिव्ह केला असता समोरून हिंदीत बोलण्याने सभा के चारो और बॉम्ब रखे है,ए बात आपको बता देता हु, आपको क्या करना है ये देखो टैक्स मॅसेज ही आला.

तीन वाजून ३७ मिनिटांनी टेक्स मेसेज आला. त्यात इंग्रजी शब्दांत हिंदी मजकूर असा,पाच बजेतक एक करोड भेज दे, महाजन को बोल दे नही तो बहुत बडा धमाका हो जाएगा,मालेगाव मै मेरे आदमी खडे है,नही तो तुमारी मर्जी,असा मजकूर आहे,असे तक्रारीत म्हटले आहे, पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*