नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार, निलेश राणे यांची शरद पवार यांच्यावर टीका

जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांना केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांना केला आहे.

मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. ‘उदयनराजे व संभाजीराजे या दोघांनाही भाजपनं राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यामुळं ते भाजपचीच भाषा बोलणार असे म्हणत पवार म्हणाले होते की या दोन छत्रपतींनीच भाजपाकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवून घ्यावा, असे पवार म्हणाले होते.

याबाबत निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शरद पवार यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे आश्चर्य वाटतं. पण जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार? या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत काही दिवसांपूर्वी भाजप खासदार उदयनराजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर जातनिहाय आरक्षण रद्द करा अशी भूमिका मांडली होती.

मराठा समाज आता एकटा नाही, एवढंच सांगतो. मी सोबत आहे, असंही ते म्हणाले आहेत. सरकार दखल घेत नसेल लढावंच लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*