महाविकास आघाडी सरकारमधील अर्धे मंत्री मराठा आरक्षणाविरोधात, गिरीश महाजन यांची टीका


  • राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, अशी टीका माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

विशेष प्रतिनिधी

जळगाव : राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना मराठा आरक्षण देऊ नये असं वाटतं, अशी टीका माजी जलसंपदा मंत्री गिरीश यांनी केली आहे.maratha reservation latest news

महाजन म्हणाले की, मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण दिलं, मराठा आरक्षणासाठी आम्ही केंद्र सरकारकडे जा म्हटलं नाही. राज्यातील जवळपास 90 टक्के समाज हा उपेक्षित आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे. कोर्टात तारीख आली तरी सरकार लक्ष ठेवत नाही. हे सरकार दिल्लीलाही जात नाही आणि कमिटीही तयार करत नाही. कारण सरकार आरक्षणाविषयी गंभीर नाही.maratha reservation latest news

maratha reservation latest news

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर बोलताना महाजन म्हणाले की, आजवर भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही. आजही भाजपच्या ताब्यात राज्यातील 80 टक्के महापालिका आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरु झाला, असे नव्हे. मुळात भाजप मोठा पक्ष आहे. भाजपमधून अनेक मुख्यमंत्री गेले आणि आलेसुद्धा, पण त्याने फरक पडला नाही. त्यामुळे भविष्यातही भाजप पक्ष हा वाढतच जाईल.maratha reservation latest news

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था