ममतांच्या बंगालमध्ये हैवानांचा हैदोस भर बाजारात लटकवला भाजपा आमदाराचा मृतदेह; हत्येचा संशय


  • जे. पी. नड्डांचा ममतांवर निशाणा

वृत्तसंस्था

कोलकाता : ममता बँनर्जी यांच्या पश्चिम पश्चिम बंगालमध्ये हैवानांचा हैदोस पाहायला मिळाला. भर बाजालात लटकलेल्या अवस्थेत भाजपा आमदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर दिनाजपूर येथील एका दुकानाच्या बाहेर आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह आढळला. भाजपाने ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. घरापासून एक किमी अंतरावर देवेंद्र यांचा मृतदेह आढळला.

देवेंद्र यांच्या कुटुंबातील एका सदस्याने केलेल्या दाव्यानुसार, काही लोक मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी आले आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले. देवेंद्र यांच्या कुटुंबाने याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. पीटीआयने याची बातमी दिली आहे.

सकाळी काही लोकांना देवेंद्र यांचा मृतदेह दुकानाबाहेर लटकलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. भाजपाने देवेंद्र यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट केले असून ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे. अत्यंत क्रूरपणे देवेंद्र नाथ रे यांची हत्या करण्यात आली आहे. हे अत्यंत धक्कादायक आहे. यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये गुंडाराज आहे आणि कायदा सुवस्था ढिसाळ असल्याचे स्पष्ट होत आहे”.

देवेंद्र नाथ रे यांनी २०१६ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून सीपीएमच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. काँग्रेसने पाठिंबा दिलेला होता. पण गतवर्षी लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती