लव्ह जिहाद’च नव्हे तर लिंगभेदाचेही तनिष्क जाहिरातीत समर्थन; कंगना रनौटची टीका

टाटा ग्रुपचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रांड तनिष्कच्या नव्या जाहिरातीवरुन वाद सुरु झाला आहे. ही जाहिरात केवळ ‘लव्ह जिहाद’ नाही तर लिंगभेदाचेही समर्थन करते, असे मत अभिनेत्री कंगना रनौटने व्यक्त केले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : टाटा ग्रुपचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रांड तनिष्कच्या नव्या जाहिरातीवरुन वाद सुरु झाला आहे. ही जाहिरात केवळ ‘लव्ह जिहाद’ नाही तर लिंगभेदाचेही समर्थन करते, असे मत अभिनेत्री कंगना रनौटने व्यक्त केले आहे.

तनिष्काच्या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. जाहिरातीचा प्लॉट इंटरकास्ट मॅरेजवर आधारित आहे. यातून ‘लव्ह जिहाद’ला समर्थन देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. या जाहिरातीवर अभिनेत्री कंगना रनोट हिनेही नाराजी व्यक्त केली आहे.

कायम रोखठोक मत व्यक्त करणारी कंगना आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणाली, ‘आपल्या श्रद्धांचा स्वीकार केल्याने एक हिंदू मुलगी घाबरत आपल्या सासरच्या व्यक्तींसमोर वावरते. ती घरातील सदस्य नाही का? ती त्यांच्यावर अवलंबून आहे असे का दाखवण्यात आले आहे? ती स्वत:च्या घरात अशी परकी का वाटत आहे? लज्जास्पद आहे हे,’ असे कंगनाने म्हटले आहे.

तनिष्कच्या या जाहिरातीवर टीका करताना कंगनाने आपल्या पुढील ट्विटमध्ये लिहिले, ‘ही जाहिरात अनेक पद्धतीने चुकीची वाटते. हिंदू सून मागील बर्याच काळापासून तिच्या सासरच्या लोकांबरोबर राहते, मात्र जेव्हा ती त्यांना वंशाचा दिवा देणार असते तेव्हा तिचा स्वीकार केला जातो. ती फक्त मुलाला जन्म देण्यासाठी आहे का? ही जाहिरात केवळ ‘लव्ह जिहाद’ नाही तर लिंगभेदाचेही समर्थन करते.

एक हिंदू म्हणून हे क्रिएटीव्ह टेररिस्ट आपल्या मनामध्ये काय टाकत असतात याबद्दल आपण जागरुक रहायला हवे. याबद्दल आपण विचारपूर्व चर्चा करायला हवी आणि त्यानंतर आपल्याला काही ठराविक विचार करायला भाग पाडले जाते का याचा विचार करायला हवा, असे कंगना म्हणते. आपली संस्कृती वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असे तिने म्हटले आहे.

तनिष्कच्या या प्रमोशनल जाहिरातीमध्ये एका हिंदू मुलीला मुस्लिम कुटुंबाच्या सूनेच्या रुपात दाखवण्यात आले आहे. हिंदू मुलीचे मुस्लिम घरात लग्न झाले आहे आणि तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे. यामध्ये हिंदू कल्चर लक्षात घेता मुस्लिम कुटुंब सर्व प्रथा-परंपरा हिंदू धमार्नुसार करत आहे.

जाहिरातीच्या शेवटी ती गर्भवती महिला आपल्या सासूला विचारते, ‘आई ही प्रथा तर तुमच्या घरात नसते ना? यावर तिची सासू उत्तर देते की, ‘पण मुलीला खूश करण्याची प्रथा तर सर्वच घरात असते ना?’

ही जाहिरात म्हणजे ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार असल्याचा आरोप करत अनेकांनी ‘तनिष्क’वर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावरुन केली आहे. वाढता वाद बघता ‘तनिष्क’ने ही जाहिरात सोशल मीडियावरुन काढून टाकली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*