कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी, पियुष गोयल यांचा विश्वास

केंद्र सरकारने केलेले कृषी सुधारणा कायदे, आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतील, असे मत केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी सुधारणा कायदे, आपल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतील, असे मत केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केले.

तेलंगणा चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महासंघाच्या ‘नव्या जगाची रचना- आत्मनिर्भर भारत’ या विषयवरील कार्यक्रमात ते बोलत होते. गोयल म्हणाले, या कायद्यांमुळे देशातील कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. यामुळे शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. कृषी क्षेत्राला अधिक सुसंघटीत करुन, खाजगी क्षेत्रांचा यात सहभाग वाढवणे आणि नव्या संधी निर्माण झाल्यामुळे शेतकरी या कायद्यामुळे अधिक सक्षम होईल. आपल्या शेतकऱ्यांना किमान हमी भावाचा पर्याय असेल किंवा ते थेट बाजारपेठेत आपला माल विकू शकतील.

आत्मनिर्भर भारताविषयी बोलताना गोयल म्हणाले की, जागतिक बाजारासाठी भारताची कवाडे अधिकच खुली झाली आहेत. आपण जगातल्या कुठल्याही भागातून आता असे आधुनिक तंत्रज्ञान घेऊ शकतो, जे भारताला अधिक चांगल्या सेवा पुरवण्यास सक्षम असेल. आपण देशांतर्गत उद्योगांचा विस्तार करण्यासाठी देखील, तंत्रज्ञानाचा वापर करु शकतो. आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणारी व्होकल फॉर लोकल योजना, या अभियानाच्या भविष्यासाठीचा अविभाज्य भाग आहे. भारत एक अशी अर्थव्यवस्था तयार करेल, जिथे उच्च दर्जाची उत्पादने देशातच तयार होतील आणि आपण एक आत्मनिर्भर देश बनू शकू.

भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी पुढे येऊन एकत्र काम करावे, असे आवाहन करून गोयल म्हणाले, यामुळे भारत एक युवा, सशक्त जागतिक अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल आणि जागतिक पटलावर आपल्या हक्काची आणि योग्यतेची जागा आपल्याला मिळू शकेल. शाश्वत पायाभूत सुविधांचे निर्माण आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठीचे आमचे प्रयत्न आम्हाला वाढवण्याची गरज आहे. जिथे भारताचे तुलनात्मक आणि स्पर्धात्मक पातळीवर भक्कम स्थान आहे, अशा क्षेत्रात, जागतिक नेतृत्व करण्यासाठी आपल्याला देशाला तयार करायचे आहे.

रेल्वेच्या प्रयत्नांची माहिती देतांना त्यांनी सांगितले की सप्टेंबरच्या या 29 दिवसात, गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के अधिक मालवाहतूक झाली आहे. आपण काल 29 सप्टेंबर 2019 च्या तुलनेत आणखी 33 टक्के मालवाहतूक केली आहे. माल तसेच प्रवासी वाहतूक वाढवली आहे. मालवाहू गाड्या, दुप्पट गतीने धावत आहेत. आता आम्ही नव्याने वेळापत्रक जाहीर करतो आहोत. रेल्वेने या काळात गेल्यावर्षीच्या मालवाहतुकीचा आकडाही यंदा पार केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*