आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे लाज वाचविली, पण कुलभूषण जाधव यांना ठेवले तणावात


आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आपली लाज वाचविण्यासाठी पाकिस्तानने भारतीय दुतावासातील दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी दिली. मात्र, या भेटीच्या वेळी कुलभूषण हे तणावात होते असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या कुलभूषण यांना अमानवी वागणूक दिली असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या मानवाधिकारांबद्दल एरवी सजगता दाखवणारे तथाकथीत पुरोगामी कुलभूषण जाधव यांचा पाकिस्तानकडून होणाऱ्या छळाबद्दल मात्र मौन पाळून आहेत. भारत सरकार मात्र ठामपणे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे पाकिस्तानला उघडे पाडत आहे. 


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आपली लाज वाचविण्यासाठी पाकिस्तानने भारतीय दुतावासातील दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांन भेटण्याची परवानगी दिली. मात्र, या भेटीच्या वेळी कुलभूषण हे तणावात होते असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुलभूषण जाधव आणि भारतीय राजनैतिक अधिकारी यांच्या भेटीची व्यवस्था पाकिस्तानने ठरल्याप्रमाणे केली नव्हती. यामुळे या भेटीत मुक्त संवाद साधता आला नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोटया आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे.

मागच्या आठवडयात कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. भारताने याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पाकिस्तानला ही उपरती झाली.

आंतरराष्ट्रीया न्यायालयाच्या निकालानुसार वकिली सल्ला आणि मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी ही पूर्वअट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना  कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. त्यानुसार इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला भेटीसाठी चार वाजताची वेळ देण्यात आली आहे.

दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची भेट घेण्याची परवानगी द्यावी, ही मागणी सुद्धा पाकिस्तानने मान्य केली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये २० जुलै फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले होते.  कुठल्याही अर्टी-शर्थीविना भेटण्याच्या परवानगीशिवाय पाकिस्तानने चर्चेसाठी इंग्रजी भाषेची सक्ती करु नये, अशी मागणी सुद्धा भारताने केली आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. तरीही कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था