भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, अपाचे, चिनूक हेलिकॉप्टर दाखल


भारतीय हवाई दलाची ताकद वाढली असून अपाचे आणि चिनूक ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स दलामध्ये दाखल झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये या हेलिकॉप्टरच्या खरेदीचा करार केला होता.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद वाढली असून अपाचे आणि चिनूक ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स दलामध्ये दाखल झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये या हेलिकॉप्टरच्या खरेदीचा करार केला होता.

हवाई दलामध्ये लढाऊ विमानांइतकेच हेलिकॉप्टरलाही महत्व आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर टेहळणी करण्यासाठी त्यांचे महत्व आहे. त्यामुळेच भारताने अपाचे सर्वात प्रगत अडव्हांस व्हॅरिएंट एएच-64 ई खरेदी केले आहे. ते आतापर्यंत 17 देशांकडे आहे. एच-64 ई हे अपाचेमधील लेटेस्ट कम्युनिकेशन सिस्टम, नेव्हिगेशन, सेंसर आणि वीपन सिस्टम प्रणालींनी सुसज्ज आहे. यात एक सिस्टम आहे ज्याद्वारे दिवसा, रात्र आणि सर्व प्रकारच्या हवामानात लक्ष्याबद्दल माहिती सहज उपलब्ध करता येते.

अमेरिकन एविएशन कंपनी बोईंगने अपाचे आणि चिनूक सैन्य हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्त केली आहेत. मार्चच्या सुरूवातीला हिंदुस्तान एअर फोर्स स्टेशनला 5 चिनूकची शेवटची खेप व जूनच्या शेवटच्या आठवड्यात 5 अ‍ॅपाचे हेलिकॉप्टरची शेवटची खेप देण्यात आली.

भारतीय वायुसेनेने चिनूकचे लेटेस्च व्हर्जन सीएच-47 एफ (आय) खरेदी केले आहे. जगभरात वीस देशांच्या एअरपोर्टमध्ये एकतर चिनूक हेलिकॉप्टर सामिल आहे किंवा त्याची खरेदी केली जात आहे. चिनूक 50 वर्षांपासून जगातील सर्वात विश्वासार्ह हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टर आहे. ते गरम हवामान, उंची आणि जोरदार वाऱ्यातही सहज उड्डाण करू शकते.

हैदराबादमधील बोईंग कंपनी टाटासह जॉइंट वेंचर (टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेड (टीबीएएल) च्या माध्यमातून अपाचेच्या एरोस्स्ट्रक्चर्सची निर्मिती करते. सध्या मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया मोहिमेंतर्गत बोईंग 200 हून अधिक भागीदारांसह भारतासोबत काम करत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती