नाशिकमध्ये खडसे समर्थक आमदार नजरकैदेत? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


विशेष प्रतिनिधी

नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. दरम्यान भाजपमध्ये अद्याप कुठली प्रतिक्रीया उमटली नाही व स्वतःखडसे यांनी देखील या चर्चेला अर्थ नसल्याचे सांगितले आहे. तरी खडसे यांच्याबरोबबर बारा ते पंधरा आमदार जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागल्याने त्यापार्श्वभूमीवर जिलह्यातील काही आमदारांवर भाजपकडून वॉंच ठेवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंनी पक्ष सोडला तरी त्यांच्याबररबोर एकही आमदाराने जाऊ नये,यासाठी फिल्डींग लावली जात असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात भाजपची सत्ता असतांना एकनाथ खडसे यांच्याकडे मंत्रीमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे महसुल मंत्री पद होती. त्याचबरोबर अन्य खाती त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री झाले नसलेतरी प्रबळ मंत्री म्हणून त्यांचे ते समोर आले होते, पण कालांतराने भोसरी भूखंड व्यवहारांच्या निमित्ताने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. खडसे यांना भाजपमधून धक्का देण्याचे तंत्र एवढ्यावरच थांबले नाही.

विधानपरिषद,विधानसभा निवडणूकीत त्यांना पराभवाचे धक्के बसले. जळगावमधील स्थानिक स्वराज्य संस्थावरील त्यांची पकड ढिली करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाल्याचे खुद्द खडसे यांनी अनेकदा सांगितले. राज्य पातळीवर देखील संघटनेत त्यांना स्थान दिले नाही. त्यामुळे दर दोन,चार महिन्यांनी खडसे नाराजी व्यक्त करत राहिले. मध्यंतरीच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी लक्ष केल्यानंतर खडसे आता पक्ष सोडणार नाही अशी चर्चा सुरु झाली.

जयंत पाटील-खडसे यांची भेट

दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जळगाव येथे खडसे यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे चर्चा सुरु झाली होती. पण जळगाव ऐवजी बुधवारी मुंबईतच त्यांनी बैठक घेतली. बैठकीच्या निमित्ताने खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली,पण खडसेंनी त्याला नकार दिला आहे.

फार्म हाऊसची भेट अन् आमदार नजरकैदेत

खडसे भाजपला रामराम ठोकणार व सोबत भाजपचे बारा ते पंधरा आमदार सुध्दा त्यांच्यासोबत जाणार असल्याची देखील चर्चा आहे. त्या अनुषंगाने खडसे यांच्याबरोबर कोण जाणार याबाबत तर्कवितर्क लावतांना नाशिकमध्ये खडसे समर्थक आमदार कोण, याचा शोध घेतला जात आहे. आमदारांवर कार्यकर्त्यांकडून छुप्या पध्दतीने नजर ठेवली जात असून हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना प्रादुर्भावापैकी शहरातील भाजपच्या एका आमदाराने खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील फार्म हाऊसवर भेट घेतली होती. त्यासंदर्भातून आमदारांच्या नजरकैदेचा मुद्दा समोर आला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था