हिंदुस्थानी राख्यांनी दिला चीनला ४ हजार कोटी रुपयांचा दणका


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या हाकेला भारतीय उद्योजकांनी प्रतिसाद दिला आहे. राखी पौर्णिमेच्या पवित्र बंधनाचाही बाजार करणाऱ्या चीनला हिंदूस्थानी राख्यांनी तब्बल चार हजार कोटी रुपयांचा दणका दिला आहे. सणासुदीच्या काळात भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात उत्पादने ओतणाऱ्या चीनला यामुळे जबरदस्त धक्का बसला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या हाकेला भारतीय उद्योजकांनी प्रतिसाद दिला आहे. राखी पौर्णिमेच्या पवित्र बंधनाचाही बाजार करणाऱ्या चीनला हिंदुस्थानी राख्यांनी तब्बल चार हजार कोटी रुपयांचा दणका दिला आहे. सणासुदीच्या काळात भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात उत्पादने ओतणाऱ्या चीनला यामुळे जबरदस्त धक्का बसला आहे.

चीनने गलवान खोऱ्यात भारताच्या २० सैनिकांची निर्घृण हत्या केली होती. यामुळे संपूर्ण भारतीय जनमानस संतप्त झाले होते. त्यामुळे आर्थिक आघाडीवर युध्द लढण्यासाठी चीनी मालावर बहिष्काराचे अस्त्र उगारण्याचा निर्णय भारतीयांनी घेतला. त्याला उद्योजकांनी साथ दिली. त्यामुळे सणासुदीला भारताच्या बाजारपेठेत आपली उत्पादने ओतून प्रचंड फायदा कमाविण्याच्या चीनच्या मनसुब्यांना उध्वस्त करण्यात यश मिळाले आहे.

पंतप्रधानांनी चीनबरोबर तणावाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत आणि लोकलला व्होकल करण्याचा संदेश दिला होता. १० जून रोजी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने राखी पौर्णिमा हिंदुस्थानी राखीने साजरी करण्याचा निश्चय केला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्याचा प्रश्न होता. परंतु, भारतीय महिला त्यासाठी पुढे आल्या. घराघरात, अंगणवाड्यांत, कुटीरोद्योगात आणि कारखान्यांमधून महिलांनी ही जबाबदारी स्वीकारली.

संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या तब्बल एक कोटी भारतीय राख्या बनविण्यात आल्या. भारतीय वस्तूंचा उपयोग करून नवनवीन डिझाईनच्या आकर्षक राख्या बनविण्यात आल्या. त्यामुळे या वर्षी चीनमधून एकही राखी आली नाही.

कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी माहिती दिली की, दरवर्षी सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या पन्नास कोटी राख्या विकल्या जातात. यापैकी तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या राख्या चीनमध्ये बनविलेल्या असतात. मात्र, या वर्षी एकही राखी आयात करण्यात आली नाही.

चीनविरोधी बहिष्कारास्त्राचे पुढचे पाऊल म्हणून येत्या ९ ऑगस्ट रोजी चीन भारत छोडो (चीन क्विट इंडिया) मोहीम राबविली जाणार आहे. देशातील ८०० वेगवेगळ्या ठिकाणी चीन क्विट इंडिया अशा घोषणा दिल्या जाणार आहेत. सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत आहे. त्याचे स्वागत व्यापारी आपल्या दुकानात दीप प्रज्वलीत करून आणि घंटा वाजवून करणार आहेत, असेही भरतीया यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती