सोबत कोणीच नसल्यामुळे खडसे झाले केविलवाणे,वरिष्ठांना दाखविण्यासाठी धडपड,गिरीश महाजनांचे टिकास्त्र


विशेष प्रतिनिधी

जळगाव : भाजप पक्ष सोडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, मात्र त्यांना वाटत होते तसे झाले नसून त्यांच्या सोबत कोणीच गेले नसल्याने ते हताश झाले आहे. किरकोळ कार्यकर्त्यासोबत फोटो काढून त्यांचा केविलवाणा प्रयत्न करत असे टिकास्त्र माजी आमदार गिरीश महाजन यानी खडसेंवर आज केले.

जामनेर मतदारसंघातील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा दावा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे करण्यात आला होता. त्यावर बोलतांना महाजन म्हणाले, अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. एकनाथ खडसे यांचा हा अत्यंत केविलवाणा प्रकार आहे. भाजपतून राष्ट्रवादीत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सोबत येतील,असा त्याचा दावा होता,पण आज एकनाथ खडसे यांच्या सोबत कोणीच पक्ष सोडून जात नसल्यामुळे आता ते राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच बोलावून त्यांच्या गळ्यात पक्षाचे गमचे टाकून प्रवेश केल्याचे दाखविले जात  आहे.

जामनेर तालुक्यतील दोनशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याच सांगितले जात आहे, पण आताही आपला दावा आहे की, आपला एकही कार्यकर्ता गेलेला नाही, त्यांच्यासोबत गेलेले कार्यकर्ते भाजपचे आहेत,हे खडसे यांनी सिध्द करून दाखवावे,असे आवाहनही त्यांनी दिले आहे. आपल्यासोबत कोणीही आलेले नाही, म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दाखविण्यासाठी खडसे यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोपही महाजन यांनी केला आहे

मुक्ताईनगरचा विचार करा

खडसे यांच्यावर टिका करतांना ते म्हणाले, खडसे यांनी जामनेरचा मुळीच विचार करू नये, त्यांची चिंताही करू नये, त्यांनी सदयस्थितीत मुक्ताईनगरची चिंता करावी, कारण त्यांच्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील जनाधार पूर्णपणे कमी झाला आहे. त्याठिकाणी त्यांनी लक्ष द्यावे

खडसेंची प्रतिमा काढली

भाजप कार्यालयातून काढण्यात आलेल्या प्रतिमेच्या वादाबाबत ते म्हणाले,खडसेंची प्रतिमा आम्ही त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानतर त्याच दिवशी काढली. त्यानंतर कोणाचीही प्रतिमा काढण्याचा संबंध येत नाही, मात्र सध्या दिवाळीनमित्त कार्यालयाचे रंगरंगोटी करण्यात येत असल्याने सर्वच प्रतिमा आम्ही काढल्या आहेत. त्यामुळे कै.निखिल खडसे याची प्रतिमा काढण्याचा संबंध नाही.

अर्णववर सुडाच्या भावनेने कारवाई

अर्पणव गोस्वामी यांच्यावरील कारवाईबाबत ते म्हणाले, राज्य शासन आता सुडाच्या भावनेने कारवाई करीत असल्याचे दिसत आहे. आमच्या विरूध्द कोणी बोलले तर त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करू हाच संदेश राज्य शासन देत आहे. पत्रकारांचीही गळचेपी आता राज्य शासनाने सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती