शेती, परदेशी गुंतवणूक, उत्पादन क्षेत्रात उसळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास


भारतातील शेती, एफडीआय, मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये वेग आणि गाड्यांच्या विक्रीत उसळी आली आहे. ईपीएफओमध्ये जास्त लोक जोडली जाणे हा नोकरीधंद्याचा वेग वाढल्याचे दाखवत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतातील शेती, एफडीआय, मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये वेग आणि गाड्यांच्या विक्रीत उसळी आली आहे. ईपीएफओमध्ये जास्त लोक जोडली जाणं हे नोकरीधंद्याचा वेग वाढल्याचे दाखवत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. (agriculture production and productivity)

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. शेती आणि उद्योग क्षेत्रात सुधार येणे ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे. नवा उद्योग कायदा हा उत्पादक आणि कामगारांसाठी फायदेशीर आहे.

चीनी व्हायरस प्रतिबंधक लसीबाबत ते म्हणाले की, जेव्हा कधी लस येईल ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. सध्याच्या बदलत्या स्थितीतही जगभरात ‘न्यू इंडीया’ व्हिजनची संकल्पना देशासमोर ठेवली. सरकारला केवळ विरोध करायचाय ते काहीही बोलत राहतात. व्हॅक्सीन जेव्हा येईल तेव्हा प्रत्येकाला दिली जाईल.

agriculture production and productivity

चीनी व्हायरसच्या धोक्याच्या सर्वाधिक जवळ असलेल्यांना लसीकरणात प्राधान्य असेल. चीनी व्हायरसविरोधातील युद्ध समोरुन लढणाºया कोरोना योद्ध्यांना दिले जाईल. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप वॅक्सीन बनवण्याचे काम करत आहेत. आता देखील वॅक्सीन बनवण्याची प्रक्रीया सुरु आहे, ट्रायल सुरु आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था