निवडणुकीपूर्वीच दिग्विजय सिंह यांची सौदेबाजी, समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी आमिष


भारतीय जनता पक्षावर आमदारांच्या खरेदीचा आरोप करणाºया कॉँग्रेसने मध्य प्रदेशात निवडणुकीपूर्वीच सौदेबाजी सुरू केली आहे. समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आमिष दाखवित असल्याचा आॅडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, आपण विकाऊ नसल्याचे या उमेदवाराने ठणकावून सांगितले आहे. (digvijay singh latest news)


विशेष प्रतिनिधी 

ग्वाल्हेर : भारतीय जनता पक्षावर आमदारांच्या खरेदीचा आरोप करणाºया कॉँग्रेसने मध्य प्रदेशात निवडणुकीपूर्वीच सौदेबाजी सुरू केली आहे. समाजवादी पक्षाच्या एका उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आमिष दाखवित असल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, आपण विकाऊ नसल्याचे या उमेदवाराने ठणकावून सांगितले आहे.

ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार रोशन मिर्झा यांच्याशी दिग्विजय सिंह बोलतानाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये सुरूवातीला दिग्विजय सिंह यांचा पीए मिर्झा ांच्याशी बोलतो. त्यानंतर दिग्विजय फोन घेतात. ते म्हणतात की तुम्ही निवडणूक का लढविता आहात? भारतीय जनता पक्षाला जिंकविण्यासाठी निवडणूक लढत आहात का? निवडणूक कशी लढवायची हे तरी माहिती आहे का? कॉँग्रेस आणि भाजपा कोणत्या परिस्थितीत निवडणूक लढवित आहे हे तुम्ही पाहत अ ाहात. या भांडणात तुम्ही कशाला पडता?

निवडणुकीतून माघार घेतली तर तुमची सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल, असेही दिग्विजय सिंह सांगत आहेत. त्याचबरोबर मिर्झा यांना पुढच्या ग्वाल्हेर महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदाचे आमिषही दाखवित आहे.


याबाबत मिर्झा यांनी म्हटले आहे की सुनील शर्मा यांना पाठिंबा देऊन माघार घेण्यासाठी दिग्विजय सिंह यांनी मला आमिष दाखविले. त्याचबरोबर भोपाळमधील अन्य काही कॉँग्रेस नेत्यांनीही मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी विकाऊ नाही. मी माझ्या समाजासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे.

digvijay singh latest news

कॉँग्रेस स्वत:ला मुस्लिमांच्या हितासाठी काम करत असल्याचे म्हणविते. परंतु, आताच्या १६ उमेदवारांपैकी किती मुस्लिमांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. मुस्लिम समाजाला कॉँग्रेसने आपल्या हातातील खेळणे बनविले आहे. कॉँग्रेसमधील सगळेमुस्लिम नेते केवळ गर्दी गोळा करण्यासाठी आहेत. प्रत्यक्षात मुस्लिमांसाठी कॉँग्रेसने काहीही काम केलेले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी मी निवडणूक लढविणारच आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती